तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणासाठी प्रवाशांना जाण्याची बसेसला परवानगी देण्यात आली आहे. बसमधील चालक व वाहक कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून बससेवा सुरू केली आहे. नवापूरचे आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, सोमवारपासून नवापूरहून चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारामार्गे नंदुरबार जाण्यासाठी तीन बसेस सोडण्यात आल्या होत्या. कोरोनाचे नियमावलीचे पालन करीत लोकल बससेवा सुरू केली आहे. पुढील आदेश आल्यावर उर्वरित बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. कोरोना काळात लालपरीचे प्रचंड नुकसान झाले. परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
दीड महिन्यानंतर नवापूर आगारातून बससेवा सुरू, अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांना मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST