शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

नऊ महिन्यानंतर उत्साह व आनंदाला उधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:19 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या नऊ महिन्यांपासून सण, उत्सव, घरगुती आणि सार्वजनिक समारंभ यांच्यावर असलेल्या बंधनांमुळे घराबाहेर फारसे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या नऊ महिन्यांपासून सण, उत्सव, घरगुती आणि सार्वजनिक समारंभ यांच्यावर असलेल्या बंधनांमुळे घराबाहेर फारसे न पडणाऱ्या नागरिकांनी दिवाळी पर्वात मात्र मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आनंद, उत्साह आणि चैतन्याचे दिवाळी पर्व उत्साहात साजरे केले. कोरोनाची भीती असली तरी आवश्यक उपाययोजना करून या आनंदात सर्वजण सहभागी होत असल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी सायंकाळी लक्ष्मी पूजनानिमित्त व्यापारी प्रतिष्ठाने, घरोघरी पूजन करून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. बाजारातील उलाढालीतही मोठी वाढ झाली.यंदाच्या दीपोत्सवाला कोरोना आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीची किनार असली असली तरी त्यातला उत्साह आणि चैतन्य कमी झाले नाही. सर्वत्र अपूर्व उत्साहात दीपोत्सव साजरा केला गेला. सर्वत्र लक्ष, लक्ष दिव्यांच्या झगमगाटाने दाही दिशा उजळल्याचा भास निर्माण झाला. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर बाजारातील उलाढाल देखील गेल्या तीन ते चार दिवसांच्या तुलनेत अधिक झाली. सायंकाळी व्यापारी वर्गाने लक्ष्मी पूजन केल्यानंतर केलेल्या फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत उजळून निघाला.यंदा कोरोना, लाॅकडाऊन, अवकाळीपासून, अतिवृष्टी याचा शेतकरी वर्गासह कामगार, सर्वसामान्य यांना सामना करावा लागला. त्याचा थेट परिणाम अर्थातच बाजारपेठेवर उमटला. दिवाळी पर्वाच्या आधीपर्यंत बाजारपेठेतील उलाढाल जेमतेमच असतांना वसुबारसपासून मात्र, अचानक उलाढाल वाढली, ग्राहकांनी खरेदीत उत्साह दाखविला. गेल्या पाच दिवसातील उलाढाल कोट्यवधींच्या घरात गेली. बाजारातील उलाढालीचा परिणाम अर्थातच चलन फिरण्यात झाल्याने दिवाळीचा उत्साह काही औरच राहिला. शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.दिवाळी पर्वातील लक्ष्मीपूजनाला व्यापारीदृष्ट्या विशेष महत्त्व असते. दिवाळीच्या पाच दिवसातील तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. वर्षभरासाठी लागणाऱ्या नवीन चोपडी, खतावणी यांची पूजा करून व्यापारी नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ करतात. दिवसभर ग्राहकांची गर्दीनंतर सायंकाळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून लक्ष्मी पूजनाची तयारी केली. त्यामुळे बाजारातील गर्दी ओसरली. तरी बाजारपेठेत लक्ष्मीपूजनामुळे वातावरणात चैतन्य पसरले होते.सायंकाळी सात वाजेपासून फटाक्यांची आतशबाजी सुरू होती. लक्ष्मीपूजनानंतर तर मोठ्या प्रमाणावर आतशबाजी करण्यात आली. यंदा आकाशात विद्युत रोशणाई करणारे फटाके मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आल्याने आसमंत उजळून निघाला होता. लक्ष्मीपूजनाचा उत्साह... : सायंकाळी लक्ष्मीपूजन उत्साहात करण्यात आले. सायंकाळी सहा ते रात्री साडेसात व नऊ ते मध्यरात्रीपर्यंत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त होते. मोठ्या व्यापारी प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीपूजनाचा खास सोहळा होता. लक्ष्मी पूजनासाठी लागणारे बत्तासे, लाह्या, केरसूनी, ऊस आदींचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. व्यापा-यांचे नवीन आर्थिक वर्ष लक्ष्मीपूजनापासून सुरू होत असल्यामुळे  खतावणी, चोपडी यांचे पूजन करण्यात आले. नवीन खतावणी व चोपडींवर आता सर्व आर्थिक व्यवहार लिहीले जाणार आहेत. खतावणीप्रमाणेच आता सर्व आर्थिक व्यवहाराचा आलेख व मांडणी ही संगणकावर राहत असल्यामुळे काही व्यापा-यांनी खतावणीसह संगणकाचेही पूजन केले.

  झेंडू : २०० रुपये किलो... झेंडूच्या फुलांचा भाव कायम होता. २०० रुपये किलोपर्यंत विक्री सुरू होती. आवक अगदीच कमी होती. त्यामुळे नागरिकांनी इतर फुलांची खरेदी केली. 

   विद्यूत रोषणाईचा झगमगाट इमारती, व्यापारी प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळे,  सार्वजनिक कार्यालयांच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे शहर उजळून निघाले.