शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दिर्घ प्रतीक्षेनंतर नंदुरबारात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:36 IST

आतार्पयत सरासरीचा 25 टक्के पाऊस : पिकांना जीवदान, जोरदार पावसाची अपेक्षा कायम

नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दरम्यान, जिल्ह्यात 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या पावसामुळे पिकांना जीवदान देखील मिळाले आहे. जिल्ह्यात सरासरीचा केवळ 25 टक्के पाऊस झाला आहे. झालेला पाऊस देखील अनियमित असल्यामुळे पिकांना त्याचा काहीही फायदा होत नव्हता. परिणामी पेरणी केलेली वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. वेध शाळेतर्फे वेळोवेळी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणून इशारा दिला जात होता. परंतु जिल्हा वगळून इतरत्र पाऊस येत असल्याने शेतक:यांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यामुळे प्रत्येकालाच पावसाची आस लागून होती.सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. शनिवार व रविवार सुटीचे गेल्यानंतर सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चाकरमान्यांची कामावर जाण्याची धावपळ असतांना पावसाने रिपरिप लावल्याने जनजिवनावर परिणाम झाला होता. सोमवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधीक प्रमाणात असल्याचे चित्र होते. यामुळे मात्र दुर्गम भागातील अनेक रस्त्यांवर पाणी व चिखल यामुळे रहदारीवर परिणाम झाला.धडगाव तालुक्यात सर्वाधिकआतार्पयत जिल्ह्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 37.45 टक्के तर सर्वात कमी नंदुरबार तालुक्यात अवघा 16 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यात अद्यापही अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक शेतक:यांनी पिकांना चुहा पद्धतीने देखील पाणी देण्याचा प्रय} केला. आजच्या पावसामुळे मात्र शेतक:यांच्या जिवात जीव आला आहे. नवापूर तालुक्यात 21.83, तळोदा तालुक्यात 26.42, शहादा तालुक्यात 28.27 तर अक्कलकुवा तालुक्यात 22.68 टक्के पाऊस झाला आहे. नदी, नाले अद्यापही कोरडेजिल्ह्यात नदी, नाले अद्यापही कोरडेच आहेत. तापी वगळता एकही नदी अद्यापही दुथडी भरून वाहू लागली नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.81 टक्के पेरण्याजिल्ह्यात आतार्पयत एकुण 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात 114 टक्के पेरण्या या शहादा तालुक्यात झाल्या आहेत तर सर्वात कमी 61 टक्के पेरण्या या नवापूर तालुक्यात झाल्या आहेत. नंदुरबार तालुक्यात 83.8, तळोदा तालुक्यात 68.20, धडगाव तालुक्यात 93.33 तर अक्कलकुवा तालुक्यात 63.88 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडेसारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडे करण्यात आले आहे. जुलैच्या मध्याला बॅरेजचे दरवाजे उघडे करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ते पुन्हा बंद केले जात असतात. साधारणत: दोन्ही बॅरेजेस 70 ते 85 टक्के भरण्यात येत असतात. पाण्याचे लेव्हल कायम राहावी यासाठी हे बॅरेज पुर्ण क्षमतेने भरले जात नसल्याचे सांगण्यात   आले.