शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

10 वर्षानंतर पुलाचे काम, नवीन पुलावर वाहनधारकांची सेल्फी मात्र उद्घाटन न झाल्याने बांधकाम विभागाने केली रहदारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 18:57 IST

हातोडा पुल 15 ऑगस्टर्पयत नागरिकांसाठी खुला न केल्यास काँग्रेसतर्फे उद् घाटन करण्याचा इशारा

ठळक मुद्देहातोडा पुलाच्या लोकार्पणासाठी तारीख पे तारीखबांधकाम पूर्ण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनधारकांची पुलावर गर्दी.15 ऑगस्टर्पयत लोकार्पण न झाल्यास काँग्रेसने दिला उद्घाटन करण्याचा इशारा

ऑनलाईन लोकमतनंदुरबार,दि.13 -  तळोदा ते नंदुरबार दरम्यान तापी नदीवर असलेल्या हातोडा पुल नागरिकांनी खुला केल्यानंतर पुलावर सेल्फी काढणा:यांसह प्रवास करणा:यांची रविवारी गर्दी झाली. मात्र काही तासांतच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पुल रहदारीसाठी बंद केल्याने वाहनधारकांची निराशा झाली. 15 ऑगस्टर्पयत पुलाचे लोकार्पण न झाल्यास काँग्रेसतर्फे उद्घाटन करण्याचा इशारा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला आहे.नंदुरबार ते तळोदा हे अंतर 10 किलोमीटरने कमी करण्यासाठी गुजरात हद्दीत हातोडा ते सज्जीपूर गावांदरम्यान पुलाचे बांधकाम 2007 पासून सुरू करण्यात आले होत़े 10 वर्षापासून या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होण्याची प्रतिक्षा होती़ गेल्या एक वर्षापासून अंतिम टप्प्यात बांधकाम आल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या वारंवार भेटी व पाहणी दौरे पुलावर वाढले होत़े यात वेळावेळी पुल ‘अमक्या’ तारखेला सुरू होणार अशी माहिती दिली जात असल्याने तळोदा तालुक्यासह दुर्गम भागातील नागरिकांमध्ये उत्साह संचारत होता़ धडगाव ते नंदुरबार हे अंतर कमी होणार असल्याने पुलाच्या अपूर्ण बांधकामावर चर्चा रंगत होत्या़ मात्र अखेर रविवारी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती तळोद्यात समजल्यानंतर वाहनधारकांचे लोंढे पुलावरून जात होते. रविवार असल्याने पुलाला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होत़े यातच काहींनी नंदुरबारकडे जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांनी अटकाव करत पुलावर मोठा अडथळा केला आह़े अजिबात न हलणा:या अडथळ्यामुळे निराशेनेच दुचाकीस्वार परत गेल़े पुलावर दिवसभर सेल्फी काढून ती एकमेकांना पाठवण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून आल़े या पुलाच्या अधिकृत उद्घाटनची तारीख अद्याप जाहिर झालेली नसली, तरी जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी येत्या काही दिवसात उद्घाटन करून पुलावरून वाहतूक करणार असल्याचे यापूर्वीच जाहिर केले आह़े काँग्रेस करणार उद्घाटन- आमदार रघुवंशी 10 वर्षाच्या दीर्घ मुदतीनंतर पूर्ण होणा:या हातोडा पुलाचे 15 ऑगस्टर्पयत उद्घाटन न केल्यास काँग्रेसचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हे कार्यकत्र्यासह हातोडा पुलाचे उद्घाटन करणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत रघुंवशी यांनी केली आह़े येथे रविवारी बटेसिंह रघुवंशी उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली़