शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजवान उत्पादक शेतक:यांना मिळतेय वाढीव दरांचे ‘वरदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 17:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागातून नंदुरबार बाजार समितीत आजवान विक्रीसाठी येत असून चालू हंगामातील विक्रमी दरात त्याची खरेदी करण्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागातून नंदुरबार बाजार समितीत आजवान विक्रीसाठी येत असून चालू हंगामातील विक्रमी दरात त्याची खरेदी करण्यात येत आह़े यामुळे दुष्काळातही शेतक:यांना आजवान वरदान ठरत आह़े दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतक:यांचा खरीप हंगाम उत्पन्नविना गेल्याने आर्थिक नुकसान झाले होत़े यादरम्यान नंदुरबार तालुक्यासह दुर्गम भागातील आदिवासी शेतक:यांकडून 500 हेक्टर्पयत पेरणी करण्यात आलेल्या आजवानाला कमी पाण्यात फुलवण्यात शेतक:यांना यश आले होत़े यातून गेल्या महिनाभरापासून नंदुरबार बाजार समितीत आजवानची आवक सुरु असून आजअखेरीस बाजारात 3 हजार 375 क्विंटल आवक पूर्ण झाली आह़े येत्या महिनाभरापेक्षा अधिक काळ ही आवक सुरु राहणार असल्याने किमान 5 हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होऊन नवीन विक्रम होणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात येत आह़े विशेष म्हणजे यंदा बाजारात आवक झालेल्या आजवानला पहिल्या दिवसापासून प्रती क्विंटल 14 ते 18 हजार रुपये दर मिळाले होत़े या दरात आता 500 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली आह़े राज्यातील आजवान बाजारपेठ म्हणून नावरुपास येत असलेल्या नंदुरबार बाजारात सर्वाधिक खरेदी करण्यात येत़े मसाला व्यापारी आणि पूरक उद्योगांकडून मागणी असलेल्या आजवानाचे सर्वाधिक उत्पादन हे नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात घेतले जात़े 60 दिवसांपेक्षा अधिकचे पीक असल्याने शेतक:यांचा कस लागतो़ काढणीनंतरही विविध प्रक्रियांसाठी वेळ लागत असूनही शेतकरी धीराने उत्पादन घेतात़ यंदा पावसाने दिलेल्या अल्प हजेरीसोबत शेतशिवारातील कूपनलिकांच्या भरवशावर आजवानचे पीक घेण्यात आले होत़े शेतक:यांना उत्पादनाची हमी असली तरी दरांबाबत मोठय़ा अपेक्षा नसताना दर 15 हजार रुपये प्रतीक्विंटलच्या पुढे मिळत असल्याने शेतकरी सुखावले आह़े दुर्गम भागातील शेतक:यांना याचा सर्वाधिक फायदा झाला आह़े नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आजवानची खरेदी करणा:याच्या व्यापा:यांची संख्या अधिक असल्यामुळे राज्यातील मोठी बाजारपेठ म्हणूनही परिचित आह़े 2014-15 च्या हंगामात बाजारपेठेत 2 हजार 372 क्विंटल आजवान आवक झाली होती़ या आजवानला 11 हजार 730 रुपये दर होता़ 2015-16 या वर्षात 4 हजार 396 क्विंटल आवक तर 12 हजार 935 रुपये प्रतिक्विंटल दर होता़ 2016-17 या वर्षात 5 हजार 370 क्विंटल आवक होऊन आजवानला 8 हजार 286 रुपये दर देण्यात आला होता़ गेल्या वर्षात दरांमध्ये उतार आल्याने शेतक:यांचे काहीअंशी नुकसान झाले होत़े परंतू यंदा दुप्पट दर मिळाल्याने शेतक:यांमध्ये आनंद व्यक्त होत आह़े आजअखेरीस बाजारात 3 हजार 376 क्विंटल आजवान आवक झाल्याची माहिती आह़े