शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयात येत्या वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करणार- मंत्री पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना अ‍ॅड.पाडवी यांनी सांगितले, नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरू व्हावे यादृष्टीने आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे. तशा सुचना बैठकीत देण्यात आल्या. शासन स्तरावरील कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होईल. त्यादृष्टीने महाविद्यालयास मान्यता देण्याबाबतच्या केंद्रीय समितीने निर्देशित केलेल्या त्रुटींची पुर्तता युद्धपातळीवर करावी. महाविद्यालयासाठी आवश्यक पदभरतीबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आवश्यक तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यासठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. अशा सुचना देण्यात आल्याचेही अ‍ॅड.पाडवी यांनी यावेळी सांगितले. आदिवासी क्रिडा अकादमी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी क्रिडा विभागाचा बजेट कमी होता. आता वाढविण्यात आला असल्याने त्या माध्यमातून क्रिडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.