शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीकडे प्रशासनाचा कानाडोळा : सारंगखेडा परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:59 IST

वाळूची बेसुमार अवैध वाहतूक

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : तापी काठावरील टेंभातर्फे सारंगखेडा, ता. शहादा येथील नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून बेसुमार वाळू तस्करी सुरु आहे. अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनाने कडक उपाय योजनेचा अध्यादेश जारी केला असला तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाळुची सर्रास लुट सुरु आहे. महसूल विभागाने यावर्षी राज्यातील अवैध वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी नवीन अध्यादेश जारी केला आहे . शासनाच्या कडक व पर्यावरण हिताच्या अध्यादेशामुळे यावर्षी नदी पात्रातील अवैध वाळू तस्करीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाचे कडक धोरण प्रशासनासाठी फलदायी ठरत आहे .तापी काठावरील  ससदे, ता. शहादा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असला तरी काही दिवसांसाठी प्रशासकीय बाबीमुळे स्थगित आहे. आठवडय़ा भरात सुरु होण्याचे चिन्हे आहे. तशी प्रशासकीय हालचाली सुरु आहे. टेंभा, ता.शहादा येथील वाळुचे आगार सारंगखेडा गावापासून तीन किलो मिटर अंतरावर आहे. येथे वाळू लिलावासाठी प्रशासनाची तयारी होती. गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची तस्करी सुरु आहे. या ठिकाणी रात्रभर वाळुची वाहने सुरु असतात. येथील वाळू नंदुरबार व धुळे या दोन्ही जिल्ह्यात पोहचत आहे. 50 ते 60 ट्रॅक्टर, 10 ते 12 ट्रकांच्या साह्याने हजारो ब्रास वाळु रात्रभरात काढण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थाना रात्रभर भरधाव वेगात चालणा:या वाहनाचा आवाज, व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील रस्त्याची अवस्थाही वाईट झाली आहे. त्याप्रमाणे रात्रीच मोठी माया मिळत असल्याने या व्यवसायामुळे गावात ट्रक्टराची सख्या वाढली आहे. महसुल विभागाने ही कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाळु माफिया अधिकच सुसाट झाले आहे.