शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

प्रशासनाने पाहिले टंचाईचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:04 IST

कुयरीडाबर : आता कायम स्वरूपी उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष

तळोदा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुयरीडाबर, पालाबार, चिरमाळ या पाड्यांना तालुका प्रशासनाने शनिवारी भेट देवून तेथील पाणी टंचाईसंदर्भातील उपाययोजनांच्या कामाची पाहणी केली. या वेळी एका विहिरीतून वाहणाऱ्या झिºयाचे पाणी खाली उतरून काही आदिवासी महिला पाणी भरत होत्या. या वेळी तेथील पाणीटंचाईचे भीषण वास्तव प्रशासनाने पाहिले.तळोदा तालुक्यातील कुयरीडाबर, चिरमाळ, पालाबार, केलापाणी अशा दुर्गम भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या पाड्यांमधील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या वेळी या ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चादेखील केली होती. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने पाड्यांमधील पाणी व चारा छावण्यांबाबत तालुका प्रशासनास प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, इतर अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व संबंधीत ग्रामस्थांसह या पाड्यांना शनिवारी भेट दिली. हे सर्व अधिकारी केवलापाणीपर्यंत वाहनांद्वारे गेले. तेथून चार ते पाच किलोमीटर अंतर पायी डोंगर चढून वरिल पाड्यांना पोहाचलेत.पायी डोंगर चढतांना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. अधिकाºयांनी प्रथमच गावाला भेट दिल्याने गावकरीही भारावले होते. तहसीलदार लोखंडे यांनी कुयरीडाबर येथील गावकºयांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींची (शेवडी) पाहणी केली. त्या वेळी एका शेवडीतून खाली उतरून तेथील झिरपणारे पाणी काही महिला घड्यात भरत असतांना त्यांनी पाहिले. हंडाभर पाण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागत असल्याची व्यथाही गावकºयांनी प्रशासनासमोर बोलून दाखविली. तेथून पुरेसे पाणी निघत नसल्यामुळे डोंगर उतरून खालील झºयाचे पाणी प्यावे लागत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.दरवर्षी उन्हाळ्यात आम्हाला भीषण पाणीटंचाईच्या समस्येस तोंड लागत असते. त्यामुळे कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर अधिकाºयांनी ग्रामपंचायतीमार्फत जुन्या विहिरींचे खोलीकरण काम हाती घेतले आहे. या कामांची पाहणी त्यांनी केली. साधारण १५ ते २० फुटापर्यंत ही विहीर खोल गेली आहे. या उपरांतही शेवडीस पुरेशे पाणी लागले नाही तर शेवटी केवलापाणी गावापर्यंत टँकरने पाणी नेऊन तेथून गाढवामार्फत पाड्यापर्यंत पाण्याचे नियोजन करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.दरम्यान जनावरांच्या चाºया बाबत सुद्धा परिसरातील रहिवाशांचा जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी होत्या. यामुळे तालुका पशुधन अधिकारी डॉ.सामुद्रे यांनी तेथील जनावरांची माहिती घेतली. या वेळी गावकºयांनी आपल्याकडील बैल, गायी, म्हशी, शेळी अशा पाळीव जनावरांची माहिती सांगितली. अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईबाबत पाहणी केल्यामुळे गावकºयांनी समाधान व्यक्त केले.