लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत प्रत्येक घराला भेट देऊन कालमर्यादेत आरोग्य तपासणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते. यावेळी डॉ़ भारुड म्हणाले की, आरोग्य पथकांनी दररोज किमान ५० घरांना भेट देऊन माहिती अॅपवर अपलोड करावी. एका दिवसात साधारण २४ हजार कुटुंबांची माहिती संकलीत करावी. कोरोनासोबत इतर गंभीर आजाराबाबतही माहिती घेण्यात यावी. स्थानिक लोकप्रतिनिधींना सर्वेक्षणात सहभागी करून घ्यावे. स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. एखाद्या भागात बाधित व्यक्ती आढळल्यास लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शिबीर घेत स्वॅब चाचणी करावी़ ग्रामीण भागात नागरिकांना पूर्वसूचना देऊन फिरत्या पथकाच्या सहकार्याने स्वॅब चाचणी करावी. भाजीविक्रेते हातगाडीवर व्यवसाय करणारे, आरोग्य कर्मचारी, दुकानदार आदींची चाचणी करून घ्यावी. संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी हे उपयुक्त ठरणार असून ग्रामीण भागात आवश्यकता असल्यास फिरत्या पथकांची संख्या वाढवून कोरोनाचे लक्षणे असलेल्यांची तपासणी वेळेवर होईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या़दरम्यान दररोज ६०० स्वॅब घेणे आणि नवापूर, तळोदा आणि शहादा येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करून त्याची माहिती सादरकरत प्रत्येक ठिकाणी २० ते २५ बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या़ बैठकीत सर्व विभागप्रमुख सहभागी झाले होते़जिल्हा परिषदेत माझे कुटंूबचा शुभारंभनंदुरबार : जिल्हा परिषदेत माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड़ सीमा वळवी यांच्याहस्ते करण्यात आला़ सोमवारी जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात हा कार्यक्रम झाला़यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष अॅड़ राम रघुवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, आरोग्य सभापती जयश्री पाटील, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, कृषी सभापती अभिजीत पाटील, सदस्य राजश्री गावीत, भारती भील, सुभाष पटले, जान्या पाडवी आदी उपस्थित होते़ गावपाड्यांवर राबवण्यात येणारी ही मोहिम १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर आणि १२ ते २४ आॅक्टोबर अशा दोन टप्प्यात होणार आहे़ या मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेने ८४१ पथके निर्माण केली आहेत़ त्यांच्याकडून ग्रामीण भागात तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली़
माझे कुटूंब मोहिमेसाठी प्रशासनाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:28 IST