शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये अद्यापही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:49 IST

नंदुरबार : भोजन कक्ष बंद करून डीबीटीमुळे गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेल्या आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये अद्यापही शुकशुकाट आह़े डीबीटी विरोध होत असला तरी आदिवासी विकास विभागाचे संकेतस्थळ कोलमडल्याने नंदुरबार प्रकल्पांतर्गत साडेतीन हजार विद्याथ्र्याचे प्रवेश झालेले नाहीत़ गेल्या महिन्यापासून आदिवासी विकास विभागाने वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती़ प्रारंभी विभागाचे संकेतस्थळ बंद पडल्याने ...

नंदुरबार : भोजन कक्ष बंद करून डीबीटीमुळे गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेल्या आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये अद्यापही शुकशुकाट आह़े डीबीटी विरोध होत असला तरी आदिवासी विकास विभागाचे संकेतस्थळ कोलमडल्याने नंदुरबार प्रकल्पांतर्गत साडेतीन हजार विद्याथ्र्याचे प्रवेश झालेले नाहीत़ गेल्या महिन्यापासून आदिवासी विकास विभागाने वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती़ प्रारंभी विभागाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्याथ्र्याचे हाल झाले होत़े यातून संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर डीबीटीसाठी सक्तीने आधार लिंकिंग करण्याचे आदेश काढल्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांची धावपळ सुरू आह़े डीबीटीच्या सक्तीसाठी विद्यार्थी आणि आदिवासी संघटनांचा विरोध सुरू असताना पुन्हा संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रवेश रखडले आहेत़ यातून नंदुरबार प्रकल्पातील वसतिगृह आजघडीस ओस पडली असून विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आह़े नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत नवापूर, शहादा आणि नंदुरबार या शहर आणि तालुक्यांमध्ये 29 वसतिगृहे आहेत़ यात मुलींचे 12, तर मुलांचे 17 वसतिगृह आहेत़ या सर्व 29 वसतिगृहात इमारत क्षमतेनुसार 4 हजार 785 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात येतो़ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जुन्या विद्याथ्र्यासह विशेष बाबीतील विद्याथ्र्याचे प्रवेश पूर्ण झाले आहेत़ सर्व  29 वसतिगृहात आजअखेरीस 1 हजार 112 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले असले तरी 3 हजार 673 मुलामुलींचे प्रवेश अद्यापही शिल्लक आहेत़ प्रवेश घेतलेल्या या 1 हजार 112 विद्याथ्र्याच्या खात्यावर नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने  भोजन आणि निर्वाह भत्त्याची प्रती विद्यार्थी 3 हजार 600 रुपयांची रक्कम वर्ग केली आह़े तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे वाटप प्रकल्प कार्यालयाने पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आह़े ही रक्कम विद्याथ्र्याना देण्यात आली असली तरी डीबीटी विरोध करणा:या विद्याथ्र्यानी ही रक्कम खात्यातून काढलेली नसल्याची माहिती आह़े