मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ज्ञानगंगा दरोदारी आणणारा शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई, शिक्षणावर होणारा कोटय़ावधींचा चुराडा असे असतांनाही जिल्ह्यातील गुणवत्तेची लक्तरे पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून वेशीवर टांगली गेली आहेत. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत येवू नये ही बाब शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने लाजीरवाणीच म्हणावी लागेल. गुणवत्ता यादीत शुन्य विद्यार्थी येणा:या राज्यातील केवळ पाच जिल्ह्यात नंदुरबारचा समावेश असणे ही बाब आत्मचिंतन करायला लावणारी आहे. नंदुरबारचा विद्यार्थीही देशपातळीवर नावलौकीक मिळविणारा ठरावा, जिल्ह्याचे नावही शैक्षणिक गुणवत्तेबाबत राज्य व देशपातळीवर चमकावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची आस आणि इच्छा आहे. परंतु शिक्षणाचा मांडलेला खेळ, झालेले बाजारीकरण आणि केवळ डय़ुटी म्हणून काम करणारे या क्षेत्रातील मंडळी यामुळे गुणवत्ता वाढण्याची नाव घेत नसल्याची स्थिती आहे. जिल्हा असाही दरडोई उत्पन्नात राज्यात तळाला, मानव विकास निर्देशांकात तळाला, औद्योगिकरणात तळाला आता शिक्षणातही तळाला नव्हे रसातळाला जात असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत आहे. गेल्या चार वर्षात देशापातळीवर करण्यात आलेल्या ‘असर’च्या पहाणी अहवालात जिल्हा राज्यात शेवटी आहे. नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात जिल्हा विभागात शेवटी आहे. आता कालच जाहीर झालेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत देखील जिल्हा शेवटच आहे. एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकू शकला नाही ही बाब मोठी गंभीर आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सोयी स्थानिक स्तरावर उपलब्ध करून विद्याथ्र्याना सर्व प्रकारचे शिक्षण स्थानिक ठिकाणीच मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नंदुरबारात सुरू झाली आहे. आदिवासी विद्याथ्र्यासाठीची पहिली इंग्रजी माध्यमाची एकलव्य शाळा, आणखी दोन शाळांना मंजुरी, जवाहर नवोदय विद्यालयाची दुसरी शाखा, केंद्राची कम्युनिटी कॉलेज, पॉलिटेकिAक, कृषी महाविद्यालय, लवकरच सुरू होणारे वैद्यकीय महाविद्यालय आदी सुविधा येथे उपलब्ध होत आहेत. केवळ शिक्षणाच्या या सुविधा उपलब्ध करून देणे उपयोगाचे नाही तर गुणवत्ता वाढावी यासाठीही प्रय} होणे गरजेचे आहे. काल लागलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत देखील दखल घेतली जाईल अशी कामगिरी झालेली नाही. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्याथ्र्याची टक्केवारी 18.60 टक्के इतकी आहे जी राज्यात शेवटून दुसरी आहे. तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्याथ्र्याची टक्केवारी अवघी 8.91 इतकी आहे. जी राज्यात सर्वात शेवट आहे. ज्या पाच जिल्ह्यांमधील एकही विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊ शकले नाहीत त्यात नंदुरबारसह हिंगोली, वाशिम, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर सर्व जिल्ह्यातील पाच पेक्षा अधीक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. एकुणच आता जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा सुरू असलेला खेळखंडोबा थांबवून येथे काम करण्यास उत्सूक असलेले, त्या पदाला पुरेपूर न्याय देणारे आणि आपल्या पदाची प्रतिष्ठा राखणा:या अधिका:यांना येथे नियुक्त करण्यासाठी प्रय} झाला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करावा. अन्यथा गुणवत्तेची घसरगुंडी यापुढेही कायम राहील हे सांगण्यासाठी कुणा ज्योतीषाची गरज राहणार नाही.
असर, दहावी निकाल आणि शिष्यवृत्तीतही जिल्हा ‘ढ’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:26 IST