शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तापी-बुराई योजना कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तापी-बुराई सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करून शिंदखेडा तालुक्यातील दोन उपसा सिंचन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तापी-बुराई सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करून शिंदखेडा तालुक्यातील दोन उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तापी बुराई योजना संघर्ष समितीचे निमंत्रक तथा पंचायत समिती सदस्य सतिष पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तापी-बुराई योजनेमुळे नंदुरबार, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील 100 पेक्षा अधीक गावांचा कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.  1999 मध्ये या योजनेला मान्यता मिळाली आहे. परंतु काम अगदीच संथ गतीने सुरू आहे. निधीचीही कमतरता आहेच. त्यामुळे ही योजनेला गती देण्याची मागणी त्यांनी निवेदनात करण्यात आली. आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील या योजनेचे महत्व मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुराव करण्याचे आश्वासन दिले. शिवाय शिंदखेडा तालुक्यातील गुरुदत्त उपसा सिंचन योजना व म.फुले सिंचन उपसा योजना यांनाही लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.