लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : फत्तेपूर ता़ शहादा येथे नदीत विनापरवाना वाळू भरणारे दोन ट्रॅक्टर भरारी पथकाने जप्त केल़े चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आह़ेतहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले आह़े फत्तेपुर गावालगत वाकी नदीत अवैधरित्या वाळू भरणारे एमएच 18-3148 तर दुसरे विनाक्रमांक विनाक्रमांक ट्रॅक्टर दिसून आले होत़े पथक प्रमुख मुकेश चव्हाण यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई केली़़ दरम्यान पथकाने 17 सप्टेंबर रोजी शहादा ते प्रकाशा दरम्यान करजई येथे जीजे.02 ङोड 6923 या वाहनावर कारवाई करत 1 लाख 27 हजार रुपयांचा दंड केला होता़
अवैध वाळू वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:38 IST