शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य सॅनेटायझर विक्रीमुळे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विक्री करण्यात येणाऱ्या सॅनेटायझरच्या बॉटलवर शासकीय नियमानुसार माहिती दिली नसल्याने वैधमापनशास्त्र विभागाने १२ ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विक्री करण्यात येणाऱ्या सॅनेटायझरच्या बॉटलवर शासकीय नियमानुसार माहिती दिली नसल्याने वैधमापनशास्त्र विभागाने १२ ठिकाणी कारवाई केली़ वैधमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली होती़कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तू म्हणून सॅनेटायझरचा समावेश झाला आहे़ या पार्श्वभूमीवर वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी सातत्याने जिल्ह्यात भेटी देत आहेत़ यांतर्गत शुक्रवारी शहादा, नंदुरबार आणि तळोदा येथे तपासणीअंती कारवाई करण्यात आली़ नंदुरबार शहरात अजय मेडीकल, आऱजी़जगताप मेडिकल, शहादा येथे उपकार मेडिकल, जवाहर मेडिकल तर तळोदा येथे अरिहंत मेडिकल यासह १२ ठिकाणी तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवलेल्या सॅनेटायझरवर शासनाने निर्धारित केलेली घोषणा नसल्याचे आढळले होते़ याप्रकरणी न्यायालयात खटले दाखल होणार असल्याचे माहिती वैधमापनशास्त्र विभागाने कळवले आहे़ ही कारवाई तळोदा विभागाचे निरीक्षक अनिल गोसावी, नंदुरबार विभागाचे निरीक्षक विनोद सभादिंडे, योगेश शिंदे, सोमा सोनवणे यांच्या पथकाने केली़जिल्ह्यात गेल्या महिनाभरात वैधमापनशास्त्र विभागाने कारवाईचे सत्र सुरु केले असले तरी त्यांच्याकडून केवळ बॉटलच्या बाहेरील शिर्षक आणि उत्पादनाची माहिती घेण्यात येते़ यातून आतापर्यंत २० ठिकाणी कारवाई झाली आहे़ यातून आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बनावट सॅनेटायझर्स विक्रीची चौकशी करण्याची गरज आहे़ जिल्ह्यातील विविध भागात बनावट सॅनेटायझर्सची विक्री आणि साठा उपलब्ध असल्याची माहिती सातत्याने समोर येऊन कारवाई टळत आहे़