शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियातून एप्रिल फूल केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आजारासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे खोटे संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना आजारासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे खोटे संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिला आहे. १ एप्रिल रोजी एप्रिल फूल करण्याच्या नादात अनेकांकडून अफवांचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़एप्रिल महिन्याच्या प्रारंभी अनेक नागरिक मित्र परिवार किंवा नातेवाईकांना एप्रिल फुल करत असतात. त्यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र करोना विषाणूसंदर्भात संभ्रम निर्माण करणारे संदेश नागरिकांनी पाठवू नये. आपत्तीच्या परिस्थितीत अशा संदेशामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची आणि संचारबंदीचे उल्लंघन होऊन प्रशासनावर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकात संभ्रम निर्माण करणारे खोटे संदेश प्रसारित करणारी व्यक्ती व गु्रप अ‍ॅडमिनवर मुंबई पोलीस कायदा कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कळवले आहे़ पोलीस अधिक्षकांच्या या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी हाणार असून सायबर सेल जिल्ह्यातील विविध समाज माध्यमांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे़गावात फिरणे पडले महागातसोशल मिडियावर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असतानाच मंगळवारी वाहतूक शाखेकडून शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ वाहनधारकांकडून ८० वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांनी दिली आहे़ शहरात संचारबंदी काळातही केवळ हौस म्हणून वाहने घेत भटकाणाºया टारगटांवर कारवाईचे सत्र सध्या पोलीस प्रशासनाने अवलंबले आहे़ यातून ८० वाहने जप्त करण्यात आली आहे़ येत्या काळातही वाहनधारक रस्त्यावर दिसून आल्यास कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शहरातील तब्बल आठ ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त करुन माहिती घेतली जात आहे़