लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : वन विभागाकडून एकाच दिवशी तीन ठिकाणी लाकूड तस्करांवर कारवाई करण्यात आली. त्यात जामतलाव ता. नवापूर येथेच दोन कारवाई केली. तर खांडबारा भागात एका ठिकाणी अवैधरित्या वनक्षेत्रात शेतीचे कामे करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.नवापूर तालुक्यातील जामतलाव येथे एका शेतात पाला-पाचोळ्यात ४६ नग लाकूड आढळून अले. तर तेथेच (जीजे.५/ जेसी. ९२४०) या वाहनातून खैर जातिचे लाकडाची वाहतूक होत होती. या वाहनासह लाकुड जप्त करण्यात आले. त्याशिवाय नंदुरबार वनक्षेत्रातून अवैध लाकुडेची वाहतूक करत असल्याची माहिती देखील मिळाली. त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली.नवापूर तालुक्यातील खांडबारा वनक्षेत्रात देखील एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून वनक्षेत्रात शेतीची कामे करण्यात येत होती. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा येथील वनक्षेत्र कर्मचारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या कारवाईत तीन वाहनांसह लाकुड आढळून आले असून लाकडासह तीन्ही वाहनेही जप्त करण्यात आले असल्याची माहिती वन सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.
वन विभागाकडून तीन ठिकाणी लाकूड तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:43 IST