लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरतील श्रॉफ हायस्कूल परिसरात जुगार खेळणाºया तिघांवर पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला़२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास श्रॉफ हायस्कूलच्या मागील बाजूस युवराज प्रकाश कासार रा़ डुपकेश्वर कॉलनी, विशाल जीवन माळवी, रा़ गवळीवाडा व गौरव विनोद सोनी रा़ वाघेश्वरी नगर हे जुगार खेळत असल्याचे पोलीसांनी दिसून आले होते़ तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २ हजार १८० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला़ तिघेही मास्क न वापरता याठिकाणी दिसून आले होते़ याबाबत पोलीस नाईक प्रदीप सोनार यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरात जुगार खेळणाऱ्या तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:51 IST