लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खतांची जादा दराने विक्री होत असेल तसेच लिकिंग करुन काळाबाजार होत असेल तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई होणार आहे़ शेतकºयांनी तक्रारी दिल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली़ कहाटूळ ता़ शहादा येथे मशरूम उत्पादन प्रकल्पाला दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली़तालुक्यातील कहाटूळ येथील शेतकरी घनश्याम पाटील यांनी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत मशरूम उत्पादन व बीज उत्पादन प्रकल्पाला कृषी मंत्री भुसे यांनी मंगळवारी भेट देत पाहणी केली़ यावेळी साक्रीच्या आमदार आमदार मंजुळा गावित, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गट विकास अधिकारी सी. टी. गोसावी, उपविभागीय कृषी अधिकारी बी. व्ही. जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, विक्रांत मोरे, धुळ्याचे हिलाल माळी, मंडळ कृषी अधिकारी आर. एम. धनगर, कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल, कृषी सहाय्यक राहुल खेडकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविंद्र बच्छाव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा फळपिकाची लागवड दादाजी भुसे यांचा हस्ते करण्यात आली.कृषीमंत्री भुसे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली़ जिल्ह्याला आदर्शवत असा हा प्रकल्प असून जिल्ह्यातील इतर शेतकºयांनीही इथल्या बियाण्याचा वापर करून प्रकल्प कार्यान्वित करावा असे त्यांनी सांगितले़ सूत्रसंचालन पंचायत समितीचे सदस्य विजय पटेल यांनी केले़ प्रसंगी कृषीमंत्री भुसे यांनी परिसरातील शेतकºयांसोबत संवाद साधत माहिती घेतली़खताची टंचाई असेल तर येत्या चार-पाच दिवसात युरिया खताची पूर्तता केली जाईल. युरिया खताची जादा दराने विक्री किंवा लिंकिंग कोणी करत असेल तर शेतकºयांनी तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. शेतकºयांना आवश्यक तेवढा युरियाच्या साठा लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. शेतकºयंनी काळजी करू नये असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले़ तशा सूचना त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिल्या़ एकाच वेळी सर्वत्र खताची मागणी झाली त्यातच कोरोणाचे संकट आल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली. परंतु आवश्यक तेवढा युरिया उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून केंद्र सरकारकडे खताची मागणी केल्याची माहितीही त्यांनी शेवटी दिली़ तसेच केंद्राकडे जास्तीच्या युरियाची मागणी केल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले़
खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:39 IST