शहादा : शहरातील सालदार नगर भागात विवाहदरम्यान दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी दोन्ही गटातील 12 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली़ सालदारनगरातील सादिक शाह रशीद शाह यांच्या मुलीच्या विवाहवेळी दोन गटात हाणामारी झाली होती़ याप्रकरणी आधार दिलीप कोळी यांच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी इकबाल शाह हुसेन शाह, तालीफ शाह फकीर, असलम शाह फकीर, नबीखान दिलावर खान पठाण, सलीम शाह फकीर व जुनेद शाह फकीर सर्व रा़ व्यारा, यांना शहादा पोलीसांनी ताब्यात घेतले होत़े दुस:या गटातर्फे सलीम शहा रा़ व्यारा यांच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यातील संशयित किरण मधुकर ब्राrाणे, मुकेश गुलाब पवार, आधार दिलीप कोळी, शिवनाथ एकनाथ ब्राrाणे, रुपेश गुलाब पवार सर्व रा़ सालदार नगर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होत़े दोन्ही गटातील 12 जणांवर सोमवारी सकाळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन कलम 107 अंतर्गत नोटीस बजावण्यात येऊन संशयितांना ताकीद देऊन सोडून देण्यात आल़े मारहाणीच्या या घटनेनंतर प्रकाशा रोड परिसरातील वसाहतींमध्ये घबराट पसरली होती़ पोलीसांकडून सोमवारीही सालदार नगरात पोलीस बंदोबस्त तैनात होता़ दरम्यान रविवारी रात्री उशिरार्पयत संशयितांची चौकशी सुरु होती़ रविवारी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर व कर्मचा:यांनी तात्त्काळ सालदार नगरात भेट देत जमावाच्या कारवाईवर नियंत्रण आणले होत़े दोन्ही गटाकडून दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जलालुद्दीन शेख व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज सरदार हे करत आहेत़
हाणामारीप्रकरणी 12 जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:17 IST