शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चार वर्ष सश्रम कारावासची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोपर्ली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दहिंदुले येथील आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोपर्ली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा दहिंदुले येथील आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.शैलू हिरामण भील, रा.दहिंदुले, ता.नंदुरबार असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची हकिकत अशी, ३० डिसेंबर २०१७ रोजी शैलू हा आपल्या आपल्या आई वडिलांसोबत कोपर्ली येथे यात्रेसाठी गेला होता. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अत्याचारित बालिका ही शौचास गेली असता शैलू याने बालिकेचे तोंड दाबून गोठ्यात नेऊन अत्याचार केला. बालिकेने त्याच्यातून स्वत:ला त्याच्या ताब्यातून सोडवून घेत झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी बालिकेच्या वडिलांनी शैलू भील यास जाब विचारला असता त्याच्या वडिलांनी आमचा मुलगा असे करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे सांगत धमकी दिली. त्यानंतर बालिकेचे वडिल यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून शैलू भील याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीताविरुद्ध उपनिरिक्षक जी.व्ही.सानप यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आशुतोष भागवत यांच्यासमोर हा खटला चालला. साक्षी, पुरावे पहाता न्या.भागवत यांनी शैलू भील यास चार वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड.व्ही.सी.चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नितीन साबळे व गिरिष पाटील होते.