शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-खेतिया मार्गावर अपघात सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:08 IST

प्रभावी उपाययोजनेची गरज : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दिवसाआड अपघात

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : शहादा-खेतिया मार्गावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची मालिका सुरूच असून दर दिवसाआड एक अपघात होत आहे. अपघातांची मालिका रोखण्यासाठी या रस्त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, रविवारी  सुलतानपूर फाटय़ाजवळ ट्रक मोठय़ा खड्डय़ात आदळून रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचालक जखमी  झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. शहादा-खेतिया हा मार्ग  मध्य प्रदेशाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. सुसरी धरणातून गाळ वाहतूक सुरू झाल्यापासून या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहादा-खेतिया मार्गाची सद्यस्थितीत मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपघाताची मालिका सुरू झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून या मार्गावर प्रवास करावा लागत आहे. गेल्या 15 दिवसांपासून दररोज वाहन उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.  या मार्गावर दरा फाटय़ाजवळ  खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात युवक ठार झाल्याची घटना घडली. तसेच सुसरी धरणाच्या वळणाजवळ खड्डा टाळण्याच्या प्रयत्नातच ट्रॅक्टर  व बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना  घडली. सुलतानपूर फाटय़ाजवळ 22 मार्च रोजी रिक्षा वाचविण्याच्या प्रयत्नात चिकूने भरलेला ट्रक  अचानक समोर खड्डा आल्यामुळे उलटल्याची  घटना घडली होती. त्यानंतर गुरुवारी ब्राम्हणपुरी गावात मोटारसायकल अचानक  खड्डय़ात आदळल्याने मोटरसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. रविवारी  सुलतानपूर फाटय़ाजवळ काटरून घेऊन        जाणारा ट्रक (क्रमांक एम.पी.09 एचजी- 2578) इंदूरकडे भरधाव वेगाने  जात होता. अचानक रस्त्यावरील मोठय़ा खड्डय़ात ट्रक आदळला व चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला. यात चालक जखमी झाला असून ट्रकचे नुकसान झाले आहे. या मार्गावर अपघात घडणे म्हणजे खेळ झाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया  नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व ज्याठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब आहे तेथे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे.