शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

स्वीकृत सदस्याच्या राजीनाम्याने राजकीय चर्चाना ऊत

By admin | Updated: January 7, 2017 00:20 IST

हादा नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या घटनेची पुनरावृत्ती

शहादा पालिका : विषय समिती सभापती निवडीकडे लक्षशहादा नगरपरिषदेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक राजेंद्र अग्रवाल यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्यामुळे शहादा नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मागील  पंचवार्षिक कालावधीतही अवघ्या सहा महिन्यात  तत्कालीन एका स्वीकृत नगरसेवकानेही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.शहादा नगरपरिषदेत एकूण 27 सदस्यांपैकी काँग्रेसचे 11, भाजपाचे 10, एमआयएमचे चार, राष्ट्रवादी व अपक्ष एक-एक असे संख्याबळ आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व अपक्ष सदस्यांनी भाजपाला समर्थन दिले तर एमआयएमने काँग्रेसला समर्थन दिले होते. पालिकेत सदस्य संख्येवरून तीन स्वीकृत सदस्य घेण्यात आले. यात भाजपतर्फे रवींद्र जमादार यांना काँग्रेसतर्फे मकरंद पाटील यांनी तर एमआयएमतर्फे राजेंद्र अग्रवाल यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नामनिर्देशीत करण्यात आले होते. पालिका निवडणुकीच्या मतदानापासूनच शहरात वातावरणात तेढ निर्माण झाली होती. याचाच परिपाक म्हणजे एमआयएमचे चारही उमेदवार निवडून आले आणि याचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. निवडणुकीतील हा तणाव असतानाच उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत एमआयएमने काँग्रेसलाच मतदान केल्याने मुस्लिमांच्या कट्टरपंथीय संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एमआयएमच्या नगरसेवकांसह जिल्हाध्यक्षांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली होती. तसेच एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. संतप्त            जमावाने येथेच न थांबता एमआयएमच्या नगरसेवकांवर दबाव टाकणे सुरू केल्याने यातून काही विपरित घडू नये म्हणून एमआयएमच्या पाठिंब्याने स्वीकृत नगरसेवक झालेल्या राजेंद्र               अग्रवाल यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अग्रवाल यांच्या अचानक राजीनाम्यामुळे पालिका वतरुळात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे अग्रवाल  यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत          रघुवंशी, पालिकेतील काँग्रेसचे नेते दीपक पाटील, मकरंद पाटील            यांनाही न कळवता परस्पर जिल्हाधिका:यांकडे राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे. पालिकेतील आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुखांना राजीनामा देत असल्याची          गंधवार्ताही लागू न देता स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची काँग्रेसमधीलच ही दुसरी घटना आहे. मागीलवेळी पालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक जहीर शेख यांनीही अवघ्या सहा महिन्यात जिल्हाध्यक्ष अथवा पालिकेतील काँग्रेसचे नेते यांना न विचारता परस्पर आपला राजीनामा दिला होता. जहीर शेख यांनी पहिल्या सहा महिन्यात तर आता राजेंद्र अग्रवाल यांनी पहिल्या सहा दिवसातच राजीनामा दिल्याने काँग्रेस पुन्हा अडचणीत आली आहे. जहीर शेख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधातील राष्ट्रवादीने संख्यांचा खेळ करीत ही जागा त्यावेळी आपल्याकडे पटकावली होती.या वेळी भाजपाकडून अशी काही खेळी खेळली जाईल का? काँग्रेसला साथ दिल्याने संतप्त मुस्लीम कट्टरपंथीयांनी एमआयएमला            धारेवर धरल्याने यापुढे एमआयएम काँग्रेसला साथ देईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शनिवारी पालिकेच्या विषय समित्यांची निवड होणार असल्याने एमआयएमच्या भूमिकेकडे सा:यांचे लक्ष लागले  आहे.