शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीच्या पोलिसांनी गुजरातमध्ये मजूरीचे काम करून आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीच्या गुन्ह्यातील 15 वर्षापासून फरार आरोपीस पकडण्यासाठी पोलीस कर्मचा:यांनी मजुर म्हणून काम करून त्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरीच्या गुन्ह्यातील 15 वर्षापासून फरार आरोपीस पकडण्यासाठी पोलीस कर्मचा:यांनी मजुर म्हणून काम करून त्याच्या मुसक्या आवळल्या. गुजरात मधील वाकानेर येथील स्टाईल फॅक्टरीतून या चोरटय़ास अटक करून आणण्यात आले. गंगाराम उर्फ टेबल्या गुज:या बारेला-डावर, रा. फुलजवारी, ता.निवाली, जि.बडवाणी असे संशयीत आरोपीचे नाव आहे. दिनेश प्रेमजी पटेल यांच्या कुपनलिकेच्या गाडीवर तो कामाला होता. आचपा, ता.धडगाव येथे 4 मे 2005 रोजी कुपनलिकेच्या कामासाठी गाडी गेली होती. गाडीमध्ये असलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून गंगाराम याने दोन लाख 25 हजार रुपये चोरून पोबारा केला होता. याबाबत धडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्या दिवसापासून गंगाराम हा फरार होता. त्या घटनेला 15 वर्ष झाले होते. गुन्हे अन्वेशन शाखेने फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या आरोपीबाबत पथकाला माहिती मिळाली. गुजरातमधील मोरवी जिल्ह्यातील वाकानेर येथे एका टाईल्स फॅक्टरीत मुकडम म्हणून गंगाराम उर्फ टेबल्या बारेला काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. संशयीत हा मुळचा मध्य प्रदेशातील राहणारा, चोरीचा गुन्हा महाराष्ट्रात केलेला आणि पळून गेला गुजरात राज्यात. अशी सर्व परिस्थिती होती. त्याची ओळख पटविण्याची मोठी कसरत पोलिसांपुढे होती. त्यामुळे एलसीबीच्या पथकातील काही जणांनी त्या फॅक्टरीत दोन ते तीन दिवस स्वत: मजुर म्हणून कामाला सुरुवात केली. या दरम्यान गंगाराम हा संशयीत निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. पथकाने त्याला ताब्यात घेवून धडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे वरिष्ठ निरिक्षक किशोर नवले, कर्मचारी प्रदीप राजपूत, किरण पावरा, मोहन ढमढेरे, तुषार पाटील, विकास पाटील यांनी  केली.