शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विचारांचा विकास झाला तर हमखास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 11:02 IST

टीटीएसएफतर्फे महामेळावा : सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून पंप मिळाला, गिरणी, पाईप मिळाले किंवा शिकून नोकरी केली, घर बांधलं म्हणजे विकास झाला, असं नाही, सर्वात आधी विचारांचा विकास झाला की मग कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळवता येतं, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी केल़े ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनतर्फे नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळाव्यात ते बोलत होत़े अध्यक्षस्थानी ग्रँट मेडिकल कॉलेजचे सेवानिवृत्त प्रशासनाधिकारी डी़एस़वसावे तर प्रमुख अतिथी म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद्र महाजन, आयआरएस अजय खर्डे उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते याहामोगी देवीच्या प्रतिमेचे पूजन झाल़े भिल्ल समाजात पहिले जिल्हाधिकारी असा मान मिळवणा:या डॉ़ राजेंद्र भारूड यांनी उपस्थित 10 हजार विद्याथ्र्यासोबत दिलखुलास संवाद साधला़ प्रसंगी डॉ़ भारूड म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात काम करत असताना, किनवट येथील बोगस आदिवासींचे प्रकरण बाहेर काढले, यात मोर्चे आणि उपोषणांना सामोरे गेलो, अशा वेळी मनात एकच विचार होता़ मूळ आदिवासींना न्याय मिळवून द्यायचा, त्यासाठी लढलो आणि यशस्वीही झालो़ आदिवासी हा जंगलाचा राजा असतो, हे कायम ध्यानी ठेवलं, कधी कोणापुढे हात पसरला नाही़ यश मिळवायचं असेल तर त्याने मी कशात कमी पडलो याचा शोघ घेतला पाहिज़े आत्मपरीक्षण करून काय कमी आहे, ते शोधून त्यात संकल्पाचं बीज पेरावं़ मला काय व्हायचं आहे हे ठरवलं पाहिजे, त्यातून बदल घडवून आणला पाहिज़े ब:याच वेळा असं आदिवासी गाव पाडय़ावरून आलो म्हणून मुलं स्वत:ला कमी लेखतात पण ज्याने निसर्गासोबत दोन हात केले, समस्या सोडवल्या त्याला शहरी समस्यांची भिती नसावी, स्पर्धा परीक्षा किंवा इतर तत्सम ठिकाणी यश मिळवण्यासाठी केलेल्या संकल्पाला उत्साहाची जोड दिल्यास तुम्हीच तुमचे शिल्पकार होणार असेही शेवटी डॉ़ भारूड म्हणाल़े कार्यक्रमास डॉ़ भरत वळवी, डॉ़ राजेश वळवी, इंजि़ जेलसिंग पावरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील 10 हजार युवक, युवती, महिला व आदिवासी समाजबांधव  हजर होत़े मंचावर डॉ़ भारूड यांच्या मातोश्री यांचे ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले मातृतदिनाचे ‘विशेषवृत्त’ पोस्टर रूपात लावण्यात आले होत़े