शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

मेहनतीच्या जोरावर अभयची राष्ट्रीय स्तरावर ‘उंचउडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 11:52 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत यशाला गवसणी घालणारा नंदुरबारातील उंचउडीपटू अभय गुरव याची संघर्षाची गाथा काही औरच आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो गुवाहटी येथे राज्याचे प्रतिनिधीत्व करीत असून खेळाच्या माध्यमातूनच त्याची आर्मी पोस्टमध्ये निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड होणारा तो जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.एखादे ध्येय प्राप्त करावयाचे असल्यास त्यात तण-मनाने मेहनत घेतली पाहिजे. परिस्थितीचा बाऊ न करता ध्येय शिखर गाठले पाहिजे. त्यातून जे यश मिळते त्याचा आनंद काही औरच असतो. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील मुळचा अभय गुरव या उंचउडी पटूने हे सिद्ध करून दाखविले आहे.घरची परिस्थिती जेमतेम, वडिल दुसऱ्या शेतात सालदरकी करणारे. अभयच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही म्हणून त्याला शिरपूरच्या एका होस्टेलमध्ये ठेवले. तेथून शिक्षण घेवून आल्यावर नंदुरबारात शिकण्यासाठी येवू लागला. घर चालविण्यासाठी स्वत: शेतात कामाला जावू लागला. खोंडामळी ते नंदुरबार ये-जा करण्यासाठी एस.टी.पासचा खर्च परवडत नसल्याने एकवेळ त्याने शाळाच सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे त्याला प्रा.डॉ.मयूर ठाकरे यांच्या माध्यमातून मार्ग सापडला आणि त्याने आपले पुढचे ध्येय साध्य केले.मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ध्येय गाठणे सहज शक्य असते. त्यासाठी मात्र मनाची तयारी असावी. अभय हे त्याचेच एक उदाहरण असून तरुण खेळांडूपुढे तो एक चांगला आयडॉल ठरू शकणार आहे.४अभय गुरव यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे शिक्षण घेत असतांना खोंडामळी गावातून नंदुरबार शहरात दररोज ये जा करूय होता. त्याला आर्थिक खर्च परवडत नसल्याने त्याने आता शिक्षणच बंद करावे असा निर्णय घेतला. परंतु शालेय मैदानी स्पर्धांच्या वेळी क्रिडा शिक्षक डॉॅ. मयूर ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याच्यातील तळमळ, काही करून दाखविण्याची जिद्द पाहून डॉ.ठाकरे यांनी त्याला दर महिन्याला एस.टी.बस पास काढून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे गावाहून नंदुरबारात येणे-जाणे सुकर झाले. शिवाय नंदुरबारात एका दुकानावर कामालाही तो लागला. हे सर्व करीत असतांना जिल्हा क्रिडा संकुलात त्याने डॉ.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उंच उडीच्या सरावाला सुरुवात केली. खेळातील बारकावे त्याला मिळाले. त्यातून तो बरेच काही शिकला. आपण काहीतरी करून दाखवू शकतो हे त्याला कळून चुकले आणि कठोर मेहनतीला सुरुवात केली. शालेय स्पर्धांमध्ये तो चमकू लागला. राज्यस्तरावर त्याची निवड झाली.उंच उडी खेळासाठी पायात बुट नव्हते. शिवाय यासाठी कोणत्या प्रकारचे बूट लागतात हे देखील माहिती नव्हते. स्वत: कमवून त्याने बूट घेतले. इतर साहित्य मिळविले. शालेय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत उंच उडी क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले या कामगिरीच्या जोरावर अभयची आर्मी पोस्टमध्ये निवड झाली. जिल्ह्यातून तो एकमेव खेळाडू ठरला आहे. आता सुरू असलेल्या गोहाटी येथील खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आहे.