लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हावासीयांवरील आभाळमाया यंदा आटली आहे. सरासरीचा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरवर्षी जुलै अखेर किमान ६० टक्केपेक्षा अधीक पावसाची सरासरी जाते. यंदा ती ४० टक्केवर अडकली आहे. येत्या दीड महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थिती ओढावणार आहे. दरम्यान, असे असले तरी जिल्ह्यात वेळेवर आणि पिकांना आवश्यक त्या वेळी पाऊस आल्याने पिकांची स्थिती आजच्या परिस्थितीत समाधानकारक आहे.जिल्ह्यात यंदा जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला. दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पेरणीलायक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतरही वेळेवर अर्थात पिकांना जीवदान मिळण्यापुरता पाऊस येत गेल्याने पीकस्थिती समाधानकारक आहे. परंतु पावसाची तूट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्य स्थितीत तूट ३५ टक्केपर्यंत वाढली आहे. ती येत्या काळात भरून निघणे अपेक्षीत आहे.शहादा सर्वाधिकतर धडगाव सर्वात कमीजिल्ह्यात सद्य स्थितीत शहादा तालुक्यात सर्वाधिक ५२ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी २७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नवापूर तालुक्यात देखील कमी पाऊस नोंदला गेला आहे. नवापूर तालुक्यात ३४ टक्के, तळोदा तालुक्यात ४० टक्के, नंदुरबार तालुक्यात ४२ तर अक्कलकुवा तालुक्यात ४८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची तूट ही धडगाव व नवापूर तालुक्यात आहे.नदी-नाले कोरडेचदमदार आणि भिज पाऊस झाला नसल्याने अद्यापही जिल्ह्यातील अनेक नदी, नाले, कोरडेच आहेत. गोमाई आणि सुसरी नदी सोडली तर एकाही नदीला पूर आलेला नाही. या दोन्ही नद्या सातपुड्यात उगम पावतात आणि सपाटीवरील भागातून वाहत असल्यामुळे पहाडपट्टीत झालेल्या पावसाने या नद्यांना दोन वेळा पूर आलेला आहे. जिल्ह्यातील इतर कुठल्याही नदीला किंवा नाल्याला पूर स्थिती निर्माण झालेली नाही.प्रकल्प तहानलेलेचजिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प तहानलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ३६ लघु व चार मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्प मिळून सद्य स्थितीत केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. नंदुरबार शहराला ३० टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणात आधीच ४० ते ५० टक्के गाळ साचला आहे. धरण बांधल्यापासून येथील गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे कमी पावसात देखील आंबेबारा धरण आता गेल्या काही वर्षात ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. याशिवाय ७० टक्के पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात देखील पाणीसाठा झालेला नाही. गेल्या वर्षी विरचक पुर्ण क्षमतेने भरले होते. आता या धरणात ४० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या नदीवरील खोलघर धरण ओव्हरफ्लो झाल्याशिवाय विरचकमध्ये पाणी येणार नसल्याने खोलघर धरण भरण्याची वाट पाहिली जात आहे. राणीपूर, दरा, रंगावली हे प्रकल्प देखील तहानलेलेच आहेत.प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे दरवर्षी जुलै अखेर पुर्णपणे उघडले जातात. यंदा बॅरेजचे दरवाजे अद्याप पुर्ण उघडलेले नाहीत.
नंदुरबार जिल्ह्यावर आभाळमाया यंदा आटलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:50 IST