शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशी : यात्रेसाठी दररोज एक जादा बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:10 IST

नंदुरबार : 23 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रेला जाण्यासाठी विविध आगारांकडून 18 ते 22 जुलै दरम्यान, रोज एक ‘पंढरपूर स्पेशल’ एसटी बस रवाना करण्यात येणार आह़े नेहमीच्या बस व्यतिरिक्त अजून एक जादा बस सोडण्यात येणार असल्याने भाविकांची पंढरपूर वारी सुखद होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील नंदुरबार, ...

नंदुरबार : 23 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रेला जाण्यासाठी विविध आगारांकडून 18 ते 22 जुलै दरम्यान, रोज एक ‘पंढरपूर स्पेशल’ एसटी बस रवाना करण्यात येणार आह़े नेहमीच्या बस व्यतिरिक्त अजून एक जादा बस सोडण्यात येणार असल्याने भाविकांची पंढरपूर वारी सुखद होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व नवापूर आगाराकडून 18 ते 22 जुलै दरम्यान, दररोज विशेष पंढरपूर स्पेशन एक जादा बस सोडण्यात येणार आह़े सदर बस ही धुळे, नगरमार्गे, करमाळा, टेंभूर्णी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आह़े प्रवाशांच्या मागणीनुसार व समाधानकारक प्रवासी संख्येनुसार अजून अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजनही एसटी महामंडळाकडून करण्यात आले आह़े मागील आषाढी यात्रेचा इतिहास बघता जिल्ह्यातून फारसे यात्रेकरु जात नसल्याने येथील एसटी महामंडळाची पंढरपूर यात्रेचे उत्पन्न तोटय़ातच असल्याचे दिसून येत आह़े अक्कलकुवा आगाराला मागील पंढरपूर यात्रेसाठी 2 लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े यंदा ते वाढून 2 लाख  10 हजार इतके झाले आह़े मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसचे भारमान अत्यंत कमी म्हणजे 49़62 टक्के इतके राहिले होत़े दिलेल्या उद्दीष्टापैकी निम्मे उद्दीष्टसुध्दा आगारास पूर्ण करता आले नव्हत़े मागील वर्षी एकूण 28 बसफे:याव्दारे 11 हजार 570 किमीचा प्रवास करण्यात आला होता़ शहादा आगारातर्फे प्रत्येकी एक जादा गाडीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आह़े त्याच प्रमाणे एखाद्या गावातून एसटी बसची मागणी असेल आणि समाधानकारक प्रवासी संख्या असेल तर, थेट गावामध्ये एसटी बस          देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली़ नवापूर आगाराला यंदा 2 लाख 15 हजार रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आह़े मागील वर्षी 2 लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े 18 ते 22 जुलै दरम्यान, रोज एक बस सोडण्यात येणार असली तरी, प्रवासी संख्येनुसार ती बस पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात येणार आह़े त्यामुळे वेळेची निश्चिती करण्यात आली नसल्याचे आगाराकडून सांगण्यात आले आह़े थेट गावासाठी मिळणार बसप्रवासी संख्या समाधानकारक असल्यास मागणीनुसार थेट गावासाठी बस  देण्यात येणार असल्याचे नंदुरबार आगाराकडून सांगण्यात आले आह़े मागील दोन वर्षापासून नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ या गावासाठी स्वतंत्र बस देण्यात येत आह़े यंदाही गावातील यात्रेकरुंनी मागणी केल्यास थेट गावापासून पंढरपूर बस उपलब्ध करुन देण्यात येणार आह़ेभारमान वाढीसाठी प्रयत्नविविध आगार प्रशासनाकडून यात्रेदरम्यान, एसटी बसेसचे भारमान वाढावे म्हणून प्रयत्न करण्यात येत आह़े अनेक आगारांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण करताना कसरत करावी लागत आह़े यात्रेदरम्यान, एसटीने आपल्या भाडेदरात कपात करावी असे मत अनेक यात्रेकरुंकडून व्यक्त करण्यात येत आह़े चार दिवस हा यात्रोत्सव सुरु राहणार असल्याने जास्तीत जास्त  प्रवासी एसटीकडे वळावे यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़