शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आष्टे जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम : दर महिन्याला केले जाते विद्याथ्र्याचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील आष्टे (मोड) जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने पुढाकार घेत, दर दिवशी सकस अन्न देण्यासोबतच दर महिन्याला विद्याथ्र्याचे वजन करून आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम सुरू केला आह़े यातून विद्याथ्र्याचे आरोग्य चांगले राहून प्रकृती सुदृढ होत असल्याचे निदर्शनास आले आह़े ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण रूजवण्यासाठी शासन पालकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील आष्टे (मोड) जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने पुढाकार घेत, दर दिवशी सकस अन्न देण्यासोबतच दर महिन्याला विद्याथ्र्याचे वजन करून आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम सुरू केला आह़े यातून विद्याथ्र्याचे आरोग्य चांगले राहून प्रकृती सुदृढ होत असल्याचे निदर्शनास आले आह़े ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण रूजवण्यासाठी शासन पालकांची सातत्याने जनजागृती करत आह़े यातून एकही विद्यार्थी सुटू नये असा शासनाचा आग्रह आह़े जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षक यांच्या माध्यमातून हा शिक्षणाचा जागर करण्यात येत आह़े यालाच पुढे आरोग्याची जोड देण्याचे कार्य आष्टे (मोड) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक करत आहेत़ प्रत्येक विद्यार्थी हा केवळ शैक्षणिकदृष्टय़ाच नव्हे तर प्रकृतीने सुदृढ करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आह़े यासाठी शिक्षकांनी वर्गणी करून विविध साधने खरेदी करून आणली आहेत़ तीन शिक्षक, एक शिक्षिका आणि मुख्याध्यापक अशा पाच लोकांकडून चालवल्या जाणा:या या शाळेत विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यापूर्वी वजन करण्यासाठी शिक्षकांनी स्वखर्चाने इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणला होता़ या काटय़ासोबत गॅस शेगडी, गॅस कनेक्शन यासाठी लागणारा अवांतर खर्च, चांगल्या दर्जाचा पोषण आहार याची गरज होती़ हा खर्चही शिक्षकांनी वर्गणी करून दिला आह़े शिक्षकांनी केलेल्या या कार्याचे पालकांसह मोड आणि आष्टे गावातून कौतूक करण्यात येत आह़े दर महिन्याला वजन करण्यात आल्यानंतर वजनाचा तपशील शिक्षकांकडून बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात दिला जातो़ हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मागील महिने आणि चालू महिने यावरून विद्याथ्र्याच्या प्रकृतीबद्दल योग्य त्या सूचना करण्यात येत आह़े गेल्या सहा महिन्यात नियमानुसार देण्यात येणा:या पोषण आहारामुळे मुलांच्या आजारी पडण्याचे प्रमाण हे 70 टक्के कमी झाल्याचे सांगण्यात आले आह़े तळोदा तालुक्यातील आष्टे जिल्हा परिषद शाळेत या प्रकारे नित्याने उपचार करण्याचा एकमेव उपक्रम राबवण्यात येतो़ या तपासणीला शासकीय योजनेचीही जोड आह़े एखाद्या विद्याथ्र्याला जन्मजात ह्रदयरोग, स्नायूंचे आजार, हाडांचे आजार असल्याचे निष्पन्न झाल्यावर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची तरतूद आह़े अद्याप एकाही विद्याथ्र्याला याची गरज पडली नसली तरी, उपजिल्हा रूग्णालय प्रशासन याबाबत सजग आह़े