शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

97 पाणी योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 11:30 IST

ग्रामिण पाणी पुरवठा योजना : जिल्ह्यात 853 योजनांची 34 कोटी थकबाकी

ठळक मुद्दे100 मिटरमध्ये आढळली फेरफार
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विजेसंदर्भात तक्रार निवारण कक्ष किंवा ग्राहक गा:हाणे निवारण मंच यांच्याकडे न्याय न मिळाल्यास थेट विद्युत लोकपालाकडे धाव घेता येणार आहे. तेथे दोन महिन्याच्या आत तक्रार निकाली निघणार असल्याची माहिती विद्युत लोकपाल आर.डी.संख्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठाच्या 97 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. विद्युत लोकपाल आर.डी.संख्ये यांच्या उपस्थितीत नंदुरबार सर्कलमधील ग्राहकांच्या तक्रारींसदर्भात संवाद घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता आर.एम.चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, लोकपालचे सदस्य दिलीप डुंबरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंजाबराव बोरसे, एम.बी.गांगोडे आदी उपस्थित होते. 34 कोटींची थकबाकीनंदुरबार सर्कलमध्ये 853 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची तब्बल 34 कोटी 33 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरणा:या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महिनाभरापूर्वी 97 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडील एकुण थकबाकी पाच कोटी दोन लाख 33 हजार इतकी होती.नंदुरबार उपविभागाअंतर्गत एकुण 462 ग्रामिण पाणी पुरवठा योजना आहेत. त्यांच्याकडे 16 कोटी सहा लाख 24 हजार 886 रुपये थकबाकी आहे तर शहादा उपविभागात 391 योजनांची 18 कोटी 27 लाख 51 हजार 916 रुपये थकबाकी आहे. यासंदर्भातील योजनांची यादी जिल्हाधिका:यांकडे देण्यात आली असून एकाच वेळी एवढय़ा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ऑनलाईवर भरवीज कंपनीचा कारभार आता पेपरलेसकडे जात आहे. त्यामुळे विविध मोबाईल अॅप्स, वेबसाईट, ऑनलाईन या माध्यमातून कारभार सुरू आहे. ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी अॅप्स आणि ऑनलाईनचा पर्याय आहे. मिटर रिडिंगच्या तक्रारी कमी करण्यासाठी मोबाईलनंबर नोंद केल्यास त्या मोबाईलवर मिटर रिडींगची नोंद पाठविली जाते. बीलचा मेसेज देखील मोबाईलवर दिला जातो. मोबाईलवर मेसेज दाखवून बील भरणा केंद्रांवर बिल स्विकारले जाते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण यापुढे कमी राहणार असल्याचेही संख्ये यांनी यावेळी सांगितले.