शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

तळोदा आदिवासी प्रकल्पांतर्गत 9 कोटींचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:34 IST

तत्कालीन प्रकल्पाधिका:यांवर गुन्हा : 2006 ते 2008 दरम्यान लाभाच्या योजनेत अपहार

तळोदा :  तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील आदिवासींच्या दुधाळ जनावरांसोबतच विविध योजनेत 9 कोटी रूपयांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्पाधिका:यांसह 3 दुध उत्पादक व तीन सहकारी अशा सहा संस्थांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गेल्या आठ दिवसांपासून या गुन्ह्याबाबत कागदपत्रांची तपासणी सुरू होती़ तपासणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येणा:या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात़ त्याचबरोबर त्यांना दुग्धव्यवसाय करता यावा यासाठी दुधाळ गायी, म्हशी देण्याची योजना राबवण्यात आली होती़ प्रकल्पातील 28 ऑगस्ट 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या दोन वर्षाच्या काळात तत्कालीन प्रकल्पाधिकारी गुलाबसिंग एन वळवी यांनी आदिवासींना देण्यात येणा:या दुधाळ गायी म्हशींच्या योजनेत दुध उत्पादक कृषी सहकारी संस्था तळोदा, मंजुळाबाई दुध उत्पादक संस्था तळोदा, गोपाळ दूध उत्पादक संस्था तळोदा या संस्थांसोबतच महाराष्ट्र राज्य लघुउद्योजक विकास संस्था महामंडळ धुळे, महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन संस्था व आकाशदीप सहकारी संस्था या सहा संस्थांच्या संगमताने 9 कोटी 7 लाख 11 हजार 180 रूपयांचा अपहार केला़ बुधवारी दुपारी तळोदा प्रकल्पचे सहायक प्रकल्पाधिकारी अमोल मेतकर यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन प्रकल्पाधिकारी वळवी यांच्यासह सर्व सहा संस्था यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे व सहायक पोलीस निरीक्षक यादवराव भदाणे करत आहेत़ गेल्या आठ दिवसांपूर्वी तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या अधिका:यांनी आठ फायली पोलीसांकडे दिल्या होत्या़ त्यातील कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल  करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े दुधाळ जनावरांच्या योजनेत 5 कोटी 31 लाख 64 हजार, आदिवासी शेतक:यांच्या पीव्हीसी पाई, लघु उपसा सिंचन योजनेत 2 कोटी 98 लाख 24 हजार 110 रूपयांचा समावेश आह़े याबाबत भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती़ यानुसार न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायाधीश एम़जी़गायकवाड यांच्यासह पाच सदस्यांची नियुक्ती केली होती़ समितीने चौकशी केल्यानंतर ज्या-ज्या ठिकाणी योजनेत अफरातफर झाली आह़े अशा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े