शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधाराला अटक; ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांना मोठं यश, ऑपरेशन महादेव यशस्वी!
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
4
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
5
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
6
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
7
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
8
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
9
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
10
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
11
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
12
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
13
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
14
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
15
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
16
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
18
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
19
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
20
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप

२० दिवसात ८९ ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

नंदुरबार : अवघ्या २० दिवसात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींनी कोरोनाला हद्दपार केले आहे. सद्या २७९ ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण असून ...

नंदुरबार : अवघ्या २० दिवसात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींनी कोरोनाला हद्दपार केले आहे. सद्या २७९ ग्रामपंचायतीत कोरोना रुग्ण असून त्यांची संख्या अवघी ७३५ इतकी आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. दरम्यान, येत्या पंधरवड्यात सर्वच ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

गेल्या महिन्यात अर्थात मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिल अखेर पर्यंत जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावला होता. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनांना गती देण्यात आली होती. प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेत या मोहिमेत सक्रिय योगदान दिल्याने ग्रामपंचायतींची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ती एक आशादायक बाब मानली जात आहे.

गावोगावी स्वॅब तपासणी

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात गावोगावी स्वॅब तपासणी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केेले होते. ज्या गावात पाचपेक्षा अधिक बाधित रुग़्ण आढळले त्या गावात मोबाईल टीम जाऊन रॅपीड ॲटींजन कोरोना चाचणी करून घेत होते. त्यामुळे बाधित आढळताच त्याला विलगीकरण कक्षात व जास्त लक्षणे आढळल्यास त्याला थेट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. त्यामुळे कोरोना फैलावापासून गावे वाचविण्यात यश आले होते.

विलगीकरण कक्ष

दहापेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सर्वच गावांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचयातीचा हॅाल उपलब्ध करून देण्यात आला होता. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व तेथील शिक्षक यांची त्यासाठी ड्यूटी लावण्यात आली होती. कमी लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना अशा कक्षात ठेवण्यात येत होते. त्याचा परिणाम देखील गावात कोरोना संक्रमण न वाढण्यात झाला. मध्यम लक्षणे असलेल्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोय होऊन ग्रामीण भागातील कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला यश आले.

सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात

सर्वाधिक बाधित ग्रामपंचायती या नंदुरबार तालुक्यात होत्या. तालुक्यताील ११२ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना रुग्ण होते. त्यातील ३२ ग्रामपंचायती २० दिवसात कोरोनामुक्त करण्यात यश आले. तर सर्वात कमी १५ ग्रामपंचायती या धडगाव तालुक्यात होत्या. त्यापैकी २० दिवसात पाच ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यात आल्या असून दहा ग्रामपंचायतींमध्ये अवघे २७ रुग्ण आहेत. शहादा तालुक्यात ८५ पैकी १८, नवापूर तालुक्यात ८५ पैकी २१, तळोदा तालुक्यात ४३ पैकी सात तर अक्कलकुवा तालुक्यात २८ पैकी सहा ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यात यश आले. ­

२० दिवसात कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायती

२० दिवसात कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कंकाळा, कोवलीविहीर, खापर, देवमोगरा, नवनागरमुठा, रायसिंगपूर, कळमसर मोहिदा, कोठार, तलावडी-काझीपूर, मालदा, रोझवा पुनर्वसन, विहिरमाळ, सोमावलखुर्द, जमाना, निगडी, मानखेडी, सिरसानी, हरणखुरी, अंबापूर, आमसरपाडा, उमर्दे, काळंबा, कोंडाई, खोलविहिर, खामगाव, खोलगाव, घोगलपाडा, घोटाणे, चिखलपाडा, चौपाळे, नटावद, नांदर्खे, न्याहली, पाणीबारा, पिंप्रीपाडा, बामडोद, बिज्यादेवी, गुजरभवाली, भालेर, मालवन, मौलीपाडा, रजाळे, राकसवाडा, राजापूर, वडसत्रा, वरसळी, वाघोदे, शितलपाडा, समशेरपूर, हाटमोहिदा, अंठीपाडा, कालीबारा, चरणमाळ, जामनपाडा, तारापूर, तारापूर-दुगली, तीनटेंभा, धरणपूर, नवी सावरट, नागझरी, नावली, बर्डीपाडा, बोमडूपाडा, भसरावळ, भुसारगा, नावली, वडदा, वाकीपाडा, वाडी, वासदा, शिर्वे, कवळीथ, कानडीतर्फे बोरद, खरगाव, खेडदिगर, गोडलेपाडा, मलफा टेंभली, पिपरी, तिखोरा, नवलपूर, पाडळदा, बुपकरी, ब्राम्हणपुरी, मातकुट-बोराळे, राणीपूर, लिंबार्डी, वाघर्डे, शेल्टी, सुलवाडा आदी गावांचा समावेश आहे.