शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नंदुरबारातील सीसीटीव्हीचे 88 लाख रुपये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:16 IST

डीपीडीसने केले होते मंजूर : 90 कॅमेरे नव्याने बसविण्याचे नियोजन बारगळले

नंदुरबार : शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने मागणी केल्यानुसार नंदुरबारात सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाने तब्बल 88 लाख रुपये मंजुर केले होते. या वाढीव सीसीटीव्हींचा डीपीआर देखील तयार करण्यात आला होता. परंतु दीड वर्षात त्यावर काहीही कार्यवाही झाली नसल्यामुळे हा पैसा तसाच पडून आहे. त्यामुळे आजही केवळ 30 सीसीटीव्ही कॅमे:यांवरच पोलीस विभागाला भागवावे लागत आहे. परिणामी उत्सव व सणांच्या वेळी अतिरिक्त कॅमेरे लावण्याची वेळ येते.नंदुरबार शहर हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील शहर म्हणून पोलीस विभागात नोंदले गेले आहे. शहरात सण, उत्सव व इतर उपक्रमांच्या वेळी पोलिसांना बंदोबस्तासाठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात घेता दोन वर्षापूर्वी पोलीस विभागाने वाढीव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नियोजन केले होते. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार करण्यात आला होता. त्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात आली होती.डीपीडीसीने दिले 88 लाखयाबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या माध्यमातून यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. डीपीडीसीने त्यावर चर्चा करून त्याकरीता 88 लाख रुपये मंजुर करून दिले होते. त्या माध्यमातून हे सीसीटीव्ही बसविण्यात येणार होते. त्यात कॅमे:यांसह कंट्रोल कॅबीन देखील राहणार होती.90 कॅमेरे बसविले जाणारमंजुर निधीतून तब्बल 90 कॅमेरे बसविण्यात येणार आहे.  प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये उच्च दर्जाचे कॅमेर राहणार होते. एएनपीआर दर्जाचे कॅमेरे राहणार होते. या कॅमे:यांचे वैशिष्टे म्हणजे कितीही वेगाने अर्थात 140 किलोमिटर प्रती तास या वेगाने जरी वाहन गेले व कॅमे:याची नजर जर त्या वाहनाच्या नंबर प्लेटवर गेली तर ती नंबर प्लेट कॅच करण्याची क्षमता या कॅमे:यांमध्ये होती. त्यामुळे बाहेरून संशयीत वाहने, अवैध वाहतुकीची वाहने यावर नजर ठेवता येणार     आहे. शहराच्या चारही बाजुंना..या प्रोजेक्टनुसार शहरातील चारही बाजुंना हे कॅमेरे लावण्यात येणार होते. अर्थात धुळेरोड, निझररोड, प्रकाशा रोड, नळवा रोड, धानोरा रोड, नवापूर व साक्री रस्त्यांवर मुख्य प्रवेशद्वारांसोबतच वर्दीळीचे ठिकाण, संवेदनशील ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, बाजाराचे ठिकाण आदी भागात हे 90 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.सध्या 30 कॅमेरे कार्यान्वीतसध्याच्या परिस्थितीत शहरात केवळ 30 कॅमेरे कार्यान्वीत आहेत. यातील अनेक कॅमे:यांची चार ते पाच वेळा दुरूस्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांची दृष्य कॅच करण्याची क्षमता कमी झाली आहे. शिवाय काही कॅमेरे रात्रीच्या अंधारातील दृष्य टिपण्यात देखील फारसे उपयोगी नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नवीन कॅमे:यांची सध्या आवश्यकता आहे. त्यामुळे कार्यवाही होणे आवश्यक आहे.सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी डीपीडीसीमार्फत निधी उपलब्ध होतो, परंतु त्यांच्या दुरूस्तीसाठी मात्र निधी राहत नसल्याची स्थिती आहे.   नैसर्गिक कारणांमुळे कॅमेरे तुटले   किंवा खराब झाले, कुणी मुद्दाम   त्यांची तोडफोड केली तर असे कॅमेरे अनेक दिवस दुरूस्त होत नाहीत. परिणामी ते निकामी होतात. त्यामुळे कॅमेरे खरेदी करतांना आणि   लावतांना त्यांच्या दुरूस्तीसाठीच्या निधीचीही तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.शहरातील सीसीटीव्ही कॅमे:यांचा कंट्रोलरूम सध्या फडके चौकीत आहे. परंतु या ठिकाणी अपुरी जागा, सुरक्षेचा अभाव यामुळे कंट्रोल रूम पोलीस मुख्यालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.