शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात 82 नवीन योजनेची कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:53 IST

पाणी पुरवठा योजना : 83 गावांना मिळणार लाभ, दुष्काळात दिलासा

नंदुरबार : यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर मंजुर करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेअंतर्गत 83 गावांच्या 82 पाणीपुरवठा योजनांना गती देण्याची मागणी होत आहे. यासाठी 32 कोटी 74 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 16 गावाच्या योजनांसाठी सात कोटी 12 लाख रुपये देखील मंजुर केले आहेत.जिल्ह्यात यंदा दुष्काळाची धग मोठी आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अपुर्ण पाणी पुरवठा योजनांना गती देण्यासह नवीन योजना मार्गी लावाव्या यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पाठपुरवा करण्यात आला होता. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी या योजनांअंतर्गत निधी मंजुर केला आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा पाणी पुरवठा आराखडा तयार करून तो पाठविण्यात आला होता. 2018-19 चा जिल्ह्याचा आराखडा काही दिवसांपूर्वीच मंजुर करण्यात आला. या आराखडय़ामध्ये पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या योजनांचा विचार करण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील 83 वाडय़ा-वस्त्यांसाठी 82 योजनांचा समावेश राहणार आहे. एकुण 32 कोटी 74 लाख रुपये त्यासाठी खर्च अपेक्षीत आहे. या आराखडय़ामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 15 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. नवीन व चालू असणा:या 84 गावे, वाडय़ासाठी 83 योजनांकरीता 33 कोटी 89 लाख रुपयांचा आराखडाही यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 16 गावांसाठी 16 योजना मंजुर केल्या असून त्यासाठी सात कोटी 12 लाख रुपये निध उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी व जिल्ह्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी याच योजनांच्या माध्यमातून उपाय योजनांना मार्गी लावण्यात येणार आहे.  तीन वर्षापूर्वी अर्थात 2015 मध्ये केंद्र शासनाने राज्यातील पाणी पुरवठय़ाच्या अपुर्ण योजनांची    संख्या पहाता राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेत नवीन योजना घेण्यावर   काही काळापुरती स्थगिती दिली होती. तालुकानिहाय मंजुर योजना, गावांची संख्या व अंदाजीत रक्कम पुढील प्रमाणे : अक्कलकुवा तालुक्यातील 18 गावे व 17 योजनांसाठी 10 कोटी 50 लाख रुपये. धडगाव तालुक्यातील 13 गावे व 13 योजनांसाठी दोन कोटी 36 लाख रुपये. नंदुरबार तालुक्यातील 22 गावांमधील 22 योजनांसाठी 12 कोटी 25 लाख रुपये. नवापूर तालुक्यातील 15 गावांमधील 15 योजनांसाठी चार कोटी 15 लाख, शहादा तालुक्यातील 10 गावांमधील दहा योजनांसाठी दोन कोटी 89 लाख तर तळोदा तालुक्यातील पाच गावांच्या पाच योजनांसाठी 56 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.याच अनुषंगाने मागील तीन वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  राज्य हगणदारीमुक्तही जाहीर करण्यात आले आहे. हगणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरित आवश्यक निधी  चार कोटी 94 लाख रुपये देखील यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे.