शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 82 कुष्ठरोगी रोगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:26 IST

30 जणांना प्रमाणपत्राचे वाटप : गेल्या वर्षभरात सव्रेक्षणात आढळले पावणे सहाशे रुग्ण

तळोदा : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून पावणे सहाशे कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून आले असून, त्यातील 82 रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते त्यातील 30 रुग्णांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण आरोग्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी कुष्ठरोगाच्या रूग्णांचे सव्रेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात संपूर्ण जिल्ह्यातून साधारण 575 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वावर या यंत्रणेमार्फत उपचार सुरू आहेत. संबंधीत यंत्रणेकडून पुरेसा औषधोपचार मिळाल्यानंतर त्यातील 82 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान यातील 30 रुग्णांना गेल्या शनिवारी तळोदा येथील वामनराव संकुलामध्ये विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व मेळाव्यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले           आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे संजय यादव, न्यायाधिश एस.टी. मलिये, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक          डॉ.प्रिती पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आदींसह या विभागातील कर्मचारी उपस्थित    होते.जिल्ह्यातील कुष्ठरोगाच्या रूग्णांना या यंत्रणेकडून प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर या रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुष्ठरोग्यांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, मोफत बस प्रवास अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि संबंधीत यंत्रणांच्या उदासिन धोरणांचा फटका त्यांना बसत असल्याचा आरोप आहे. कारण त्यांनी सातत्याने मागणी करूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे म्हणणे आहे. आधीच कुष्ठ रोगीच्या रुग्णांबाबत समाजामध्ये नकारात्मक दृष्टीकोनाची भावना आहे. त्यामुळे असे रुग्ण माहितीसाठी पुढे येत नाही. साहजिकच त्यांना प्रशासनानेच मदत देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. जिल्हा कुष्ठरोग कार्यालयातर्फेदेखील तळोदा, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील साधारण 250 रुग्णांचे संजय गांधी निराधार योजना, घरकुले व मोफत प्रवास सवलतीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याबाबत तत्कालीन महसूल प्रशासनाशीदेखील संबंधीत यंत्रणेने चर्चा केली होती. त्याबाबत स्वतंत्र बैठकही घेण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाने दिले होते. मात्र आजतागायत त्यावर कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधीत यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून या रुग्णांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.