शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

तळोद्यात ‘डिमांड’साठी 800 प्रकरणे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:37 IST

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : तळोदा तालुक्यातील शेतक:यांची व्यथा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे डिमांडची 800 प्रकरणे शेतक:यांनी दाखल केली आहेत. गेल्या तीन वर्षापासून ही प्रकरणे प्रलंबीत आहेत. अर्थात टप्या टप्याने त्यावर कार्यवाही केली जात असल्याचा दावा संबंधीत यंत्रणा करीत असली तरी कनेक्शनअभावी शेतक:यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याने जोडणी करीता लागणारे साहित्य या विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा आहे. तळोदा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतक:यांनी सन 2014 पासून वीज जोडणीसाठी येथील वीजवितरण कंपनीकडे कंपनीच्या नियमानुसार लागणारी डिमांडची रक्कम भरली आहे. सन 2014 पासून आजतागायत साधारण 800 प्रकरणे कंपनीच्या कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. टप्प्या टप्प्याने या प्रकरणांवर कार्यवाही सुरू असल्याचा दावा अधिका:यांनी केला असला तरी त्यास अधिक गती देण्याची आवश्यकता असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. आतापावेतो मागणी केलेल्या प्रकरणामधून           निम्म्या प्रकरणांमधील शेतक:यांनादेखील जोडणी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. साहजिकच शेतक:यांना शेतात पाण्याची व्यवस्था असतांना केवळ वीज जोडणी अभावी सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. हे शेतकरी तातडीने डिमांड मिळण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयापासून थेट शहादा उपविभागाच्या कार्यालयार्पयत सातत्याने हेलपाटे मारत आहेत. तथापि प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. आठ ते 15 दिवसात तपास करा एवढेच मोघम उत्तर त्यांना मिळते. यात पैसा व वेळ वाया जात आहेच. परंतु पश्चातापही सहन करावा लागत असल्याची शेतक:यांची व्यथा आहे.वास्तविक इकडून-तिकडे उधार उसनवार व व्याजाने पैसे काढून या शेतक:यांनी शेतात कुपनलिका बरोबरच डिमांडचे पैसे वीज वितरण कंपनीकडे भरले आहे. त्यामुळे शेतक:यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. सदर क्षेत्रात येणा:या पिकांवर पैसे फेडले जातील अशी त्यांची अपेक्षा असतांना               वितरण कंपनीने त्यांच्या आशेची निराशा केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिका:याने एवढय़ा मोठय़ा संख्येने येथील कार्यालयाकडे डिमांडची प्रकरणे प्रलंबीत असतांना नाराजी व्यक्त केली आहे. शेतक:यांच्या जोडणीसाठी लागणारी वीजेची साहित्य वरिष्ठांनी तातडीने पुरविली तर प्रकरणेही तत्काळ निकाली निघतील. शिवाय शेतक:यांनादेखील ताबडतोब सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. मात्र कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनानेच याप्रकरणी उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. निदान या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी तरी दखल घ्यावी, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे. अन्यथा शेतक:यांनी या विरोधात आदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.