शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
5
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
6
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
7
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
8
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
9
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
10
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
11
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
12
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
13
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
14
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
15
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
16
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
17
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
18
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
19
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
20
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे भगर खाल्याने ७५ जणांना विषबाधा

By मनोज शेलार | Updated: March 8, 2024 22:12 IST

४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदुरबार: महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी केेलेल्या भगरीच्या फराळातून तालुक्यातील घोटाणे येथे ७५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, तालुका आरोग्य विभागाकडून गावात रात्रीच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयाचे पथक घोटाणे व रनाळे येथे तळ ठोकून आहेत.घोटाणे येथे गावातील रहिवाशांनी एका ब्रॅण्डची भगर फराळसाठी खरेदी केली होती. भगर खाल्यानंतर सायंकाळी अनेकांना त्रास जाणवू लागला. अनेकांना मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होत होता. यामुळे तात्काळ रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, यातील ४० जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते तर ५ ते ६ वृद्धांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. रात्री जिल्हा रुग्णालयाच्या पथकासह तालुका आरोग्य विभागाचे पथक रनाळा तसेच घोटाणे येथे तळ ठोकून होते. दरम्यान गावात आरोग्य विभागाकडून सर्वे करण्यात येत होता. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.नरेश पाडवी यांनी दिली. याबाबत स्थानिक पोलिस यंत्रणेला देखील माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.महाशिवरात्रीपूर्वी गावांमध्ये देण्यात आली होती दवंडी

गेल्या महिन्यात रनाळे येथे एका कार्यक्रमात भगरमधून भाविकांना विषबाधा झाल्याने आरोग्य प्रशासन यावेळी सतर्क झाले होते. यामुळे गावांमधून यापूर्वीच 'भगरपासून सावधान' असे सांगत दवंडी देवून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार