शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खापर येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 72 उपकरणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:42 IST

नंदुरबार : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 72 उपकरणे सादर करण्यात आली आहे. कृषी आणि जैविक शेती, पायाभूत सुविधा या उपकरणांना ...

नंदुरबार : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 72 उपकरणे सादर करण्यात आली आहे. कृषी आणि जैविक शेती, पायाभूत सुविधा या उपकरणांना विद्याथ्र्यानी प्राधान्य दिल्याचे चित्र प्रदर्शनातून दिसून येत आहे. खापर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि ईरा इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते रिमोटद्वारे दीपप्रज्वालन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी राजेंद्र सोनार होते. जि.प. सदस्य नितेश वळवी, नागेश पाडवी, पंचायत समितीचे उपसभापती इंद्रपालसिंह राणा, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, सरपंच करूणाबाई वसावे, उपसरपंच विनोद कामे, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण,  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष जयदेव पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, योगेश सोनार, सहा.शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, गटशिक्षणाधिकारी सचिन गोसावी, निमेश सूर्यवंशी, कपूरचंद मराठे, सुनील भामरे, दत्तात्रय सूर्यवंशी, ललीत जाट, प्रियंका सोनार, प्रेमलता अग्रवाल, अजय पटेल, देवानंद वसावे आदी उपस्थित होते.या वेळी डॉ.गावीत यांनी सांगितले की, विद्याथ्र्यानी शिक्षकांकडून प्रेरणा घेवून शास्त्रज्ञवृत्ती स्वत:मध्ये जोपासली पाहिजे. स्वत:ला शिस्त लावून घ्यावी ती पाळली तर जीवनात यशस्वी होण्यासाठी हा एक गुण पुरेसा आहे.  दैनंदिन जीवनात घडणा:या गोष्टीमध्ये विज्ञान दडलेले असते ते जाणून घेतले पाहिजे. अतिदुर्गम भागातही मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.मुकेश पाटील यांनी विज्ञान प्रदर्शन शहरात घेण्यापेक्षा ग्रामीण भागातही प्रदर्शन भरवावे या उद्देशाने खापरला घेतले असल्याचे    सांगितले.  काँक्रिटच्या जंगलासाठी शेतीचा वापर वाढल्याने उत्पादनाचे क्षेत्र कमी होत असतांना विज्ञानाच्या सहाय्याने कमी जागेत व नवीन बियाण्यांच्या सहाय्याने जास्त   उत्पादन मानवाने कसे घेता येईल हे शोधून काढले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ललीत जाट, नागेश पाडवी, योगेश सोनार, प्राचार्य डी.बी. अलेक्झांडर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विन सोनार, गोटू वळवी तर आभार पुष्पेंद्र रघुवंशी यांनी मानले.