शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

72 जोडप्यांचे झाले सामुहिक शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सहाय्यक धमार्दाय आयुक्त व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सहाय्यक धमार्दाय आयुक्त व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयात तब्बल 72 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले.शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक िववाह सोहळयाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर एस गुप्ता, जिल्हाधिकारी बालाजी मंजूळे, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सुधीर वानखडे, देवमोगरा एज्यूकेशन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, नुंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघूवंशी, अंनिसचे जिल्हाध्यक्ष हैदरअली नुरानी, विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गोपाळराव शिंपी, उपाध्यक्ष रविशंकर शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.वरांची आधी ट्रॅक्टरने शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर आधी ख्रिश्चन पध्दतीने व नंतर वैदीक पध्दतीने वधू वरांचे लग्न लावण्यात आले. जिल्हयातील 72 जोडपे या विवाह बंधनात अडकली. राजेंद्रकुमार गावित यांनी प्रत्येक जोडप्यांना कपडे, मनिष अग्रवाल यांनी प्रत्येक वधूंना एक ग्रॅमचे प्रत्येक एक मंगळसुत्र,शनिमांडळ येथील शनिश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने भोजनासाठी 70 हजार तर रविशंकर शर्मा यांनी वधूवरांना भांडयांची मदत केली. तसेच मनोज रघूवंशी यांनी संस्था व वैयक्तीक अशा दोन पध्दतीने आर्थिक मदत केली. पोलिस बँडने विवाह सोहळयास अधिक जाण आणली. आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. आधी ख्रिश्चन पध्दतीने व नंतर वैदीक पध्दतीने लग्न लावण्यात आले.विवाह सोहळयाचे प्रास्ताविक सहाय्यक धमार्दाय आयुक्त सुधीर वानखडे, गोपाळराव शिंपी यांनी केले. विश्वजीत क्षिरसागर यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार देविंसिंग राजपूत यांनी मानले. सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व धर्मीय जोडपे सहभागी झाले   होते. त्यात ािश्चन समाजातील जोडप्यांचाही समावेश होता.   वैदीक पद्धतीने आणि ािश्चन पद्धतीने यावेळी विवाह लावण्यात आले.  जे. एच. पठारे ,आर. के. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 26 ख्रिश्चन जोडप्यांचे ख्रिश्चन पध्दतीने विवाह लावण्यात आले. 72 जोडप्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित  होते.