शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सोनवद येथील आगीत 70 हजारांचा कापूस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:43 IST

सोनवद येथील घटना : दुष्काळात जेमतेम आलेले उत्पन्नही गेले वाया

शहादा :  तालुक्यातील सोनवद येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी पुंडलिक पाटील यांच्या घरात असलेल्या 13 क्विंटल कापसाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागून बाजार भावाप्रमाणे 60 ते 70 हजार रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आग्निउपद्रवाची माहिती मिळताच नगरपालिकेचा अग्नीशामक बंब वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागली तेव्हा घरी कोणीही नव्हते. शेतक:यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने आपला कापूस घरात व गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे. सोनवद येथील शिवाजी पुंडलिक पाटील या कोरडवाहू शेतक:याने भाव वाढेल या आशेने कापूस आपल्या घरात भरून ठेवला होता. ते मंगळवारी स्वत:च्या खाजगी कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. थंडीचे दिवस असल्याने ग्रामीण भागात रात्री आठ वाजेनंतर शुकशुकाट होतो. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील यांच्या घरात कापसाला आग लागल्याचे शेजा:यांना कळाल्याने या घराला कुलूप असल्याने ते तोडणे अवघड झाले होते. दरम्यान आगीने विद्रूप रूप धारण केले होते. आग विझविण्यासाठी गावातील दीपक पाटील, पंडित पाटील, ऋषिकेश पाटील, संजय पाटील, ईश्वर पाटील, जयवंत पाटील, चंद्रकांत पाटील, विकास पाटील, शरद पाटील, दिनेश पाटील, राहुल पाटील, मनोज न्हावी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. दीपक पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. या वेळी अभिजित पाटील यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देत सोनवद येथे घटनास्थळी पाठवले. गावात घर असल्याने अग्नीने पेट घेतल्यामुळे शेजारील घरांनाही त्याची झळ पोहचण्याची शक्यता असल्याने गावातील तरुण व ग्रामस्थांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रय} केला. याप्रसंगी शहादा नगरपालिकेचा बंबदेखील वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. एकीकडे शेतक:यांच्या कापसाला भाव नसल्याने शेतकरी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवत आहे. शेत मालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, अनेक ठिकाणी साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागल्याच्या घटना घडत आहे. यात शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतक:यांच्या शेती मालाला भाव नसल्याने शेती करावी की, नाही हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.शेतक:यांच्या मालाचा कृषी विभागाचे विम्याचे कवच असेल तर शेतक:यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी होत आहे.