शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम योजनेत 67 ग्रा.पं.चा सहभाग

By admin | Updated: January 11, 2017 23:29 IST

तळोदा : शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून, त्याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायतींनी सुरू केली आहे.

तळोदा : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातील सर्व 67 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून, त्याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायतींनी सुरू केली आहे. शासनाच्या या अभियानातून लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने गावक:यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त लोकसहभागातून गावक:यांबरोबरच संबंधित पंचायतींना स्वयंपूर्ण करण्यासाठी इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यकक्षेतील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाची पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन, पंचायतींची विविध करांची वसुली, अंगणवाडय़ा, शाळांची सजावट, ग्रामसभा, ग्रामसभेतील विविध विकासात्मक ठराव, गावातील विकासाच्या योजना अशी वेगवेगळी उपक्रमे राबवायची आहेत. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या उपक्रमांचाही समावेश आहे. इको व्हिलेजच्या धर्तीवर ही योजना असली तरी इको व्हिलेज केवळ वृक्षारोपणा पुरतीच मर्यादित आहे. तथापि या स्मार्ट ग्रामयोजनेत लोकसहभागातून गावाचा सर्वागीण विकासावर भर देण्यात आला आहे.तळोदा तालुक्यात स्मार्ट ग्राम अभियानात जवळपास सर्वच्या सर्व म्हणजे 67 ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. त्याबाबत कार्यवाही करून प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ग्रामीण खेडी पुन्हा स्वच्छतेची कात टाकणार आहे. तथापि गावक:यांनीदेखील आपल्या उदासीनता झटकून शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याची आवश्यकता आहे.    (तालुका प्रतिनिधी)गावाला मिळणार 10 लाखांचे बक्षीसग्रामीण खेडे स्वंयपूर्ण होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीस शासनातर्फे 10 लाखांचे प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या 100 गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल. सुरुवातीस ग्रामपंचायत स्वत: गुणांचे मूल्यांकन करेल. त्यानंतर दुस:या तालुक्यातील नेमलेली समिती मूल्यांकन करेल. जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत या बक्षिसास पात्र ठरून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात येईल. जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस 40 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असला तरी ही योजना प्रभावी व नियोजनबद्ध राबविण्याची गरज आहे. यासाठी यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे. अन्यथा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, इको व्हिलेजेस, तंटामुक्ती अशा योजनांसारखी गत होऊ नये. कारण या योजना केवळ औपचारिकता म्हणूनच राबविल्या जात होत्या. तशा व्यथादेखील गावक:यांनी बोलून दाखविल्या आहेत.