ऐन कोरोना महामारीत रक्ताच्या साठा अत्यंत कमी झाल्यामुळे ‘लोकमत परिवारा’ने रक्त संकलनासाठी रक्तदान अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीपासून करण्यात आली आहे. हे शिबिर रविवारी लोकमत व व्हीएसजीजीएम, संकल्प ग्रुप, जायंट्स ग्रुप, जैन युवाशक्ती, शहादा व्यापारी महासंघ, शहादा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, भारतीय जैन संघटना, प्रार्थना फाउंडेशन, इन्कलाब ब्रिगेड, समर्पण ग्रुप, जायंट्स सहेली ग्रुप, श्री छत्रपती रक्त फाउंडेशन, रोट्रॅक्ट क्लब शहादा, रोटरी क्लब शहादा, तापी व्हॅली, जय सरदार पटेल फाउंडेशन, जय बजरंग ग्रुप, सकल मराठा समाज, क्रीडा शिक्षक संघटना शहादा तालुका, दाऊदी बोहरा समाज, कुबेर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मनोरंजन सिनेमाच्या प्रांगणात शिबिर घेण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश पाटील, ॲड. गोविंद पाटील, आर. टी. पाटील, मानक चौधरी, भूषण बाविस्कर, उपसरपंच अनिल भामरे, डॉ. योगेश चौधरी, संपत कोठारी, गोपाल गांगुर्डे, लियाकत अली सैय्यद, अरुण चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, विनोद चौधरी उपस्थित होते. यावेळी ६३ दात्यांनी ‘लोकमत’च्या या महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान केले. या वेळी प्रांताधिकारी डॉ. गिरासे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकमत समूहाद्वारे राज्यभरातून १० ते १५ दिवसांत ५० हजार रक्त बॅगांचा साठा उपलब्ध होणे ही खूपच कौतुकाची व गर्वाची बाब असून, कोरोनाच्या अत्यंत बिकट परिस्थितीत सामाजिक बांधीलकी जोपासत लोकमतने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. लोकमतच्या या चळवळीस निश्चितच यश मिळेल व राज्यभरात एक नवा विक्रम तयार होणार.
कार्यक्रमासाठी लोकमतचे ईश्वर पाटील, हर्षल साळुंखे, हिरालाल रोकडे, व्हीएसजीजीएम व विविध सामाजिक संघटनांचे सदस्य, शासकीय रक्तपेढी, नवजीवन ब्लड बँक, मनोरंजन सिनेमाचे कर्मचारी, आदींनी परिश्रम घेतले.
बामखेडा येथील निवृत्त पर्यवेक्षक दिलीप छगन पटेल यांनी वय ६५ वर्षे असताना रक्तदान केले. आतापर्यंत पटेल यांनी ३२ वेळा रक्तदान केले आहे. तसेच डॉ. लकेश पटेल यांनीदेखील रक्तदान केले.