लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कृषीपंपांच्या वीज बिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे़ गेल्या १० वर्षात कंपनीचे ५४ हजार शेतकऱ्यांकडे तब्बल ६०० कोटी थकले असून ही रक्कम वसूल होणे शक्य नसल्याने ती माफ करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़आदिवासी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या जिल्ह्यात सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर रब्बी आणि खरीप पिकांचे आलटून पालटून उत्पादन घेतले जाते़ यात साधारण २५ हजार हेक्टरवर ऊस तर १५ हजार हेक्टरच्यापुढे क्षेत्रात बागायती फळ आणि इतर पिकांचा समावेश आहे़ या पिकांच्या संगोपनासाठी शेतकरी वेळोवेळी कृषीपंपांचा वापर करुन पिकांना पाणी देतात़ या शेतकºयांना कंपनीकडून यापूर्वी तीन महिन्यांनी वीज बिल देण्यात येत होते़ कालांतराने हे बिल एका महिन्यानंतर देण्यात येत होते़ गेल्या काही वर्षात ओला आणि सुका दुष्काळ, शेतमालाचा कमी झालेला उठाव, कापसाचे घसरलेले दर यासह इतर समस्यांमुळे शेतकºयांना तोटा आला होता़ यातून बºयाच शेतकºयांना वीज बिलाचा भरणा करण्यास अडचणी येत होत्या़ यामुळे २०१० पासून वीज बिलांची थकबाकीची रक्कम वाढण्यास सुरूवात झाली आहे़ परिणामी सर्व सहा तालुक्यात वीज बिलांची थकबाकी ही थेट ६०० कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे़ ही थकीत रक्कम वसूल करणे जवळजवळ अशक्य आहे़ यातील बरेच कनेक्शन हे वीज वापरानंतर बंद आहेत़बºयाच शेतकºयांना देण्यात आलेली वीज ही वाढीव दराने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे़ शेतकºयांच्या या दाव्यात बºयाच अंशी तथ्य असल्याचेही वेळावेळी दिसून आले होते़ कंपनीकडून सरसकट वीज बिले देण्यात आल्याने ही थकबाकी वाढल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़शहादा विभागात २६ हजार ७७५ कृषीपंपधारकांकडे तब्बल ४१२ कोटी रुपयांचे वीजबील थकीत आहे़ तर नंदुरबार विभागातील २७ हजार २७० शेतकºयांकडे २१७ कोटी रूपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे़ शेतकºयांकडे वर्षानुवर्षे हे बिले थकले आहे़ कंपनीकडून काढलेल्या वसुली मोहिमेवेळी शेतकºयांनी सरसकट विज बिलांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर बिलाची वसुली मात्र थांबवण्यात आली आहे़
५० हजार शेतकऱ्यांकडे ६०० कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 12:59 IST