लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील जागली, ता.तळोदा येथे घरफोडी होऊन चोरटय़ांनी 58 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या जागली येथील जंगलसिंग मंगलसिंग पाडवी यांच्या घरात ही घटना घडली. 9 रोजी रात्री चोरटय़ांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. घरातील सोने, चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 58 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर एकच खळबळ उडाली. तातडीने तळोदा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून जबाब घेतले.याबाबत जंगलसिंग मंगलसिंग पाडवी यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सपकाळे करीत आहे. दरम्यान, ग्रामिण भागात देखील चोरीच्या घटना वाढल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
जागलीत 58 हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:59 IST