लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्रात बंदी असलेला विमल, तंबाखू व गुटखा वाहतूक केला जात असतांना नवापूर पोलिसांनी ट्रकसह सुमारे ५५ लाखाचा तंबाखू जन्य पदार्थाचा साठा १ मे रोजी दुपारी जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक व क्लिनरला पोलिसांनी अटक केली आहे.येथील पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना एका ट्रक मधून तंबाखू जन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी शहर हद्दीत नवापूर पिंपळनेर चौफुली जवळ सापळा लावला. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात एक ट्रक क्रमांक एमएच ३१-जीबी ८८३७ ची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा व तंबाखू आढळून आला.जीवनावश्यक वस्तू वाहतुकीच्या नावाखाली महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा तांदुळाच्या चुरीच्या गोण्यांच्या आड लपवलेला आढळून आला. ट्रक आणि तंबाखुजन्य पदार्थ असा एकूण ५५ लाख रूपये किमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे पोलीस निरीक्षक विजययसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी, धीरज महाजन, पो.कॉ.प्रविण मोरे, दिनेश बाविस्कर, जयेश बाविस्कर, योगेश साळवे, निशान गिते, आदिनाथ गोसावी, कृष्णा पवार, गुमान पाडवी, शाम पेढारे, हेमंत सैंदाणे व सहकाऱ्यांनी केली. गत आठवड्यात गुजरात पोलिसांनी तस्करी उघड केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र जीवनावश्यक कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालक सवनकुमार रामचंद्र साकेत (२१) रा.रामनगर, रिवा मध्यप्रदेश व क्लीनर अजयकुमार कौशल प्रसाद साके (२०) रा.हिरामनपुर, वाराणसी युपी यांना अटक करण्यात आहे.
५५ लाखांचा तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:12 IST