शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपपांच्या 537 कोटींच्या विजबिलास मिळणार स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांमधील एक हेक्टर्पयत पीक कर्ज माफ आणि कृषीपंपांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांमधील एक हेक्टर्पयत पीक कर्ज माफ आणि कृषीपंपांच्या वीज बिल वसुलीला स्थगिती देण्याचे जाहिर केले आह़े या घोषणेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील 13 हजार पीककजर्धारक शेतक:यांची कजर्माफी आणि 537 कोटी रुपयांचे वीज बिल स्थगित होणार आह़े      जिल्ह्यात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान अतीवृष्टीमुळे 20 हजार शेतक:यांच्या 12 हजार हेक्टर जमिनीसह शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने  वर्तवला आह़े अद्याप नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याने संपूर्ण अंतिम आकडेवारी हाती आलेली नाही़  दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अतीवृष्टीत नुकसान झालेल्या शेतक:यांसाठी मदत देण्याचे जाहिर केले आह़े या घोषणेनंतर प्रशासनाने प्राथमिक अंदाज वर्तवलेल्या जिल्ह्यातील 20 हजार नुकसानग्रस्त शेतक:यांना थेट लाभ मिळणे शक्य होणार असून यात पीककर्ज धारकांची संख्या वेगळी राहणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शासनाकडून अतीवृष्टी आणि पूरग्रस्त शेतक:यांना देऊ केलेल्या सवलतींबाबत लिखित आदेश  मंगळवारी उशिरार्पयत प्राप्त झालेले नव्हत़े बुधवारी यासंदर्भात अधिकृत शासनादेश प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आह़े राज्यशासनाच्या या घोषणेमुळे जिल्ह्यातील शेतक:यांना मोठा आधार होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े यातही तीन महिन्यांकरीता स्थगिती देण्याऐवजी कृषीपंपांची संपूर्ण थकबाकी माफ करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े प्राथमिक अंदाजातील 20 हजार शेतकरी आणि पीक कर्ज धारक 13 हजार शेतक:यांसोबतच पिक विमा घेतलेल्या शेतक:यांनाही अतीवृष्टीची भरपाई मिळण्याची शक्यता आह़े जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या शहादा आणि नंदुरबार दोन विभागात एकूण 49 हजार 708 शेतक:यांकडे कृषीपंप आहेत़ 19 ऑगस्टअखेरीस या कृषीपंपांच्या वीज बिलांची रक्कम ही 537 कोटी 27 लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आह़े यात शहादा विभागात 27 हजार 500 शेतक:यांची वीजबिलाची रक्कम ही सर्वाधिक 385 कोटी रुपयांची रक्कम आह़े एकटय़ा शहादा तालुक्यात 312 कोटी रुपयांचे कृषीपंपांचे बिल थकल्याची माहिती देण्यात आली आह़े उर्वरीत 152 कोटी रुपये हे नंदुरबार विभागातील नंदुरबार, नवापुर या दोन तालुक्यातील आह़े शहादा विभागातील धडगाव-अक्कलकुवा तालुक्यात 74 कोटी रुपयांची बिल थकीत आह़े एकीकडे वीज बिलाला स्थगिती मिळत असताना दुसरीकडे पीक कर्ज घेणा:यांना कजर्माफीचा लाभ मिळणार आह़े यात आजअखेरीस जिल्ह्यातील 13 हजार 486 शेतक:यांनी घेतलेल्या 189 कोटी 89 लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश होणार आह़े जिल्हा बँकेने 5 हजार 481 सभासदांना 42 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े राष्ट्रीयकृत बँकांनी 5 हजार 189 सभासदांना 90 कोटी 42 लाख  रुपयांचे तर खाजगी आणि ग्रामीण बँकांनी मिळून 1 हजार 411 शेतक:यांना 34 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती आह़े शासनाकडून काढण्यात येणा:या आदेशात नेमक्या अर्टी शर्ती काय असतील याची उत्सुकता शेतक:यांना लागून राहणार आह़े प्राथमिक आकडेवारीनुसार 6 हजार 344 हेक्टर कोरडक्षेत्र बाधित झाले आह़े 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतक:यांची संख्या ही 11 हजार 64 एवढी आह़े यात नंदुरबार 849, नवापुर 605, अक्कलकुवा 3050, शहादा 4 हजार 858, तळोदा 1 हजार 492 आणि धडगाव तालुक्यात 210 शेतक:यांच्या 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्राचा समावेश आह़े कोरड, बागायत आणि बारमाही अशा एकूण नुकसानग्रस्त शेतक:यांची आकडेवारी ही 20 हजार 237 एवढी आह़े