शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 51 गावांमध्ये धामधूम ऐवजी सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:52 IST

ग्रामपंचायत निवडणूक : चार दिवसात केवळ एक नामनिर्देशन दाखल

ठळक मुद्दे नामनिर्देशन भरून तयार पण सबमिट रोखले निवडणूक आयोगाच्या पंचायत इलेक्शन या वेबसाईटवर नंदुरबार जिल्ह्यातील 100 च्यावर इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरून दिल्याची माहिती सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक कक्षाकडून देण्यात आली़ मात

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन पितृपक्षात ग्रामपंचायत निवडणूकांचे नामनिर्देशन भरण्याची वेळ आल्याने इच्छुकांनी हात आखडता घेतला आह़े गत चार दिवसात निवडणूक प्रक्रियेबाबतची उदासिनता सोमवारीही कायम होती़ दिवसभरात केवळ एक अर्ज दाखल करण्यात आला आह़े      शुक्रवारपासून ग्रामपंचायतींसाठी  नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तहसील कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या निवडणूक कक्ष गजबजण्याची शक्यता वर्तवली जात होती़ मात्र याउलट स्थिती गेल्या तीन दिवसात होती़ हीच स्थिती सोमवारी चौथ्या दिवशी कायम होती़  शहादा, नवापूर, नंदुरबार आणि अक्कलकुवा तहसील कार्यालयात केवळ कागदपत्रे तयार करणा:यांची  गर्दी दिसून आली़ नामनिर्देशन दाखल करून त्याची प्रिंट निवडणूक कक्षात जमा करणारे अद्यापही कक्षांकडे फिरकत नसल्याची माहिती अधिकारी व कर्मचारी यांनी दिली आह़े पितृपक्षामुळे निवडणूकीसारखा महत्त्वाचा निर्णय इच्छुकांनी दोन दिवस लांबणीवर टाकल्याची माहिती आह़े तर काही ठिकाणी निवडणूक आयोगाची पंचायत इलेक्शन ही वेबसाईट संथ इंटरनेट स्पीडमुळे वारंवार हँग होत असल्याचे सांगण्यात आले आह़े यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या ग्रामपंचायत कक्षात संपर्क केला असता, अपवादात्मक एक-दोन ठिकाणी हे घडल्याचे सांगण्यात आल़े याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता, बाहेर नामनिर्देशन दाखल करणा:या उमेदवारांना ही समस्या आल्याची माहिती मिळाली आह़े संग्राम केंद्र, आपले सरकार, ई-सेवा केंद्रासह खाजगी सायबर कॅफे व किंवा वैयक्तिक स्तरावर उमेदवार ऑनलाईन अर्ज भरणा करण्याची सोय आह़े निवडणूक आयोगाने यासाठी संबधित केंद्रांना महत्त्वपूर्ण माहिती याआधीच पाठवली आह़े