शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील ५०० वनजमिनीधारक सातबाऱ्या विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:34 IST

तळोदा तालुका : ताबा पावती मिळूनही मिळूनही उदासिनता; आंदोलनाचा इशारा

तळोदा : तालुक्यातील वनअतिक्रमीत ५०० शेतकºयांचे वनदावे मंजूर असतांना त्यांना अजूनही प्रशासनाकडून सातबारे मिळत नसल्याने या शेतकºयांनी येथील महसूल प्रशासनास सातबाºयासाठी साकडे घातले होते. दरम्यान या शेतकºयांना प्रशासनाने जमिनीची ताबा पावती देखील दिली आहे, असे असूनही सातबाºयाबाबत उदासीन भूमिका घेतली जात असल्याने याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.तळोदा तालुक्यातील वाल्हेरी, अमोनी, ढेकाटी, रापापूर, चौगाव, मनिबेली, लक्कडकोट, बन, लाखापूर, जुवानी, केलापाणी, कोठार, तथा चापला, बंधारा, अलवान, मालदा, राणीपूर, जुवानी, रावलापाणी, जांबाई, पाडळपूर, धनपूर, कालीबेल, वरपाडा असे २५ गावांमधील आदिवासी शेतकरी जवळपास १९७२ पासून म्हणजे गेल्या ४० ते ४५ वर्षापासून वनजमीन खेडत आहेत. जवळपास अडीच हजार शेतकºयांचा यात समावेश आहे. त्यातील दोन हजार श्ेतकºयांचे वनदावे अजूनही प्रलंबीत असल्याचे या दावेदारांचे म्हणणे आहे. ज्या ५०० वनअतिक्रमित शेतकºयांना शासनाने वनदावे मंजूर करून ताबा पावत्या दिल्या आहेत. त्यांना आजतागायत सातबारे देण्यात आलेले नाहीत. सातबाºयांसाठी हे शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे दुर्गम भागातून येवून हेलपाटे मारत आहेत. शासनाकडून त्यांना कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर दिले जात असते. इकडे सातबाºयाअभावी त्यांंना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना हुसकावून लावण्याचे आदेश दिल्यामुळे या दावेदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरल्याची व्यथादेखील अतिक्रमणधारकांनी बोलून दाखविली आहे.सातबाºयासाठी पुन्हा अतिक्रमण धारकांनी गुरूवारी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले होते. सातबाºयाअभावी योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची कैफीयत ही त्यांच्यापुढे मांडली होती. परंतु प्रशासनाने सातबाºयांबाबत कार्यवाही सुरू असून, प्रलंबीत दाव्यांवरदेखील कार्यवाही चालू असल्याचे मोघम उत्तर देण्यात आल्याचे दावेदारांनी सांगितले. वास्तविक अतिक्रमीत शेतकºयांच्या मुंबई येथील पायी लाँगमार्चच्या वेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आतिक्रमीत दावेदारांचे सर्व प्रलंबीत वनदावे मंजूर करून तातडीने सातबारे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रलंबीत दावे तर सोडाच ज्या दावेदारांचे सर्व दावे मंजूर करून त्यांना ताबा पावत्या दिल्या आहेत. अशांना सातबारे देण्याबाबत प्रशासनाने उदासिन भूमिका घेतली आहे. निदान अशा शेतकºयांना सातबारे देण्याची ठोस कार्यवाही करावी, अशी सदर शेतकºयांची अपेक्षा आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधींनीही उदासीन धोरण घेतल्यामुळे शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता नूतन जिल्हा प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर लक्ष घालून सातबारे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राजेंद्र पाडवी, रमेश महादू पाडवी, कालूसिंग पाडवी, केशव पाडवी, विनोद माळी, अभय वळवी, पंडित पाडवी, फुलसिंग पाडवी, प्रतापसिंग वळवी, सुकलाल पाडवी यांनी केली आहे.