शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील यात्रेत मसाला खरेदी-विक्रीतून ५० लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:04 IST

तळोदा : तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मसालाबाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे़ मसाल्यांच्या खरेदी-विक्रीतून आतापर्यंत जवळपास ५० ...

तळोदा : तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मसालाबाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे़ मसाल्यांच्या खरेदी-विक्रीतून आतापर्यंत जवळपास ५० लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती आहे़तळोदा येथील यात्रेत्सवातील मसाला बाजार प्रसिध्द आहे़ आजच्या काळात मसाले तिखट, धने, जिरे, हळद व इतर वस्तू रेडीमेट व आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत़ विविध कंपन्या या क्षेत्रात आजच्या काळात बाजारात उतरलेल्या आहेत़ परंतु येथील यात्रेत वर्षाला लागणारा मसाला आवडीप्रमाणे व आवश्यकतेनुसार विकत घेऊन दळून घेण्याची पध्दत अनेक वर्षांपासून सुरु आहे़ आजही गृहिणी येथील मसाल्यांनाच अधिक पसंती देत असतात़ या यात्रेत मसाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दहाहून अधिक दुकाने लावली आहेत़ प्रत्येक व्यावसायिक साधारणत: यात्रेत पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल करीत असतो़ यात्रेत एकंदरीत ५० लाखांपर्यंत उलाढाल झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे़ सध्या सुरु असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे मसाल्याच्या भावात काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे़ दरम्यान, महिलांकडून खडा मसाला, खोबरे, तिखट मिरची, हळद आदींना चांगली मागणी आहे़ लोणच्याचा तयार मसालाही गृहिणी यात्रेत खरेदी करणे पसंत करतात़ सर्व मिश्र मसाला १५० ते २०० रुपये किलो, हळद १२० ते १६० रुपये किलो, जिरे २२० ते २४० रुपये किलो, धने १२० ते १६० रुपये किलो, खोबरे २२० ते २४० रुपये किलो, लाल मिरची तिखट १४० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती येथील मसाल्याचे व्यापारी हाजी जाकीर हाजी गनी, हाजी शाकीर हाजी गनी या व्यापारी बंधुंकडून देण्यात आली़बैलबाजार तेजीतदरम्यान, यात्रेनिमित्त भरविण्यात येणाºया बैल बाजारातही आतापर्यंत १ कोटी २१ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे़ यात्रोत्सवानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कृषी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते़ दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बैलबाजारात खरेदी-विक्री जोमात होती़ दरम्यान, बैल बाजारात या वर्षी विक्रीसाठी १ हजार २०० बैल आले होते़ त्यातून ९८० बैलांची विक्री करण्यात आली़ त्या बैैलबाजारात महाराष्ट्राबरोबरच शेजारील गुजरात, मध्यप्रदेश राज्यातूनही आलेल्या बैलांची मोठ्या संख्येने खरेदी-विक्री झाली होती़ दरम्यान, आपल्या पशुधनाला घेऊन आलेल्या पशुपालकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या़