शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात पाच लाख बालकांसाठी आरोग्य मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक दिन साजरा होणार आह़े यावेळी सुरूवात करण्यात येणा:या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एक ते सहा आणि अंगणवाडी ते 12 च्यावर्गातील पाच लाख बालकांना रोगमुक्त करण्याचे उद्दीष्टय़ ठेवण्यात आले आह़े यानुसार शाळा व अंगणवाडीत जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार आह़े जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक दिन साजरा होणार आह़े यावेळी सुरूवात करण्यात येणा:या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एक ते सहा आणि अंगणवाडी ते 12 च्यावर्गातील पाच लाख बालकांना रोगमुक्त करण्याचे उद्दीष्टय़ ठेवण्यात आले आह़े यानुसार शाळा व अंगणवाडीत जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार आह़े जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांच्या अध्यक्षस्थतेखाली अधिकारी व जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली़ यावेळी शनिवारी जिल्ह्यात राबवण्यात येणा:या जंतनाशक मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली़ मोहिमेद्वारे जिल्हा परिषद, आश्रमशाळा, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळा आणि  अंगणवाडय़ा यातील विद्यार्थी आणि बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याचे नियोजन झाले आह़े  ऑॅगस्टर्पयत ही मोहिम चालेल़ जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आयोजित करण्यात येणा:या या मोहिमेद्वारे गतवर्षी 84 टक्के बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले होत़े फेब्रुवारी आणि ऑगस्ट या दोन टप्प्यात ही मोहिम झाली़ यात जिल्हास्तरावरील तीन लाख 34 हजार 365 पैकी दोन लाख 80 हजार बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होत़े यातही सर्वाधिक 35 हजार 214 गोळ्या ह्या तळोदा तालुक्यात वाटप केल्या गेल्या होत्या़ सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात गेल्यावर्षी 64 हजार बालकांपैकी 57 हजार तर अक्कलकुवा तालुक्यातील गाव-पाडय़ांवर 70 हजारपैकी एकूण 59 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या होत्या़ यंदा जिल्हा आरोग्य विभागाने 100 टक्के गोळ्या वाटपाचे उद्दीष्टय़ ठेवले असल्याने स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी या वाटपावर लक्ष ठेवून असणार आहेत़ शाळांमधील शिक्षकांकडून या गोळ्यांचे फायदे समजावून देण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आह़े उपक्रमासाठी जोरदार तया:या सुरू आहेत़ आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणा:या या मोहिमेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय, दोन उपजिल्हा रूग्णाल, 12 ग्रामीण रूग्णालय आणि 58 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचा:यांसह, ग्रामीण भागातील 1847 व शहरी भागातील 16 आशा स्वयंसेविकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आह़े त्यांच्याकडून शाळांचे शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांना गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह़े या मोहिमेत नंदुरबार तालुक्यातील 366 शाळांचे 88 हजार 191, नवापूर तालुक्यात 365 शाळांमधील 52 हजार 57, शहादा तालुक्याच्या 400 शाळांमधील 92 हजार 215, तळोदा तालुक्यात 192 शाळांमधील 33 हजार 773, अक्कलकुवा तालुक्यात 33 हजार 619 तर धडगाव तालुक्यातील 344 शाळांमधील 33 हजार 619 विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात समाविष्ट असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आह़ेमोहिम सर्वतोपरी यशस्वी करण्यासाठी 1 ते सहा वर्ष वयाचे विद्यार्थीही समाविष्ट आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या 402, नवापूर-347, शहादा-454, तळोदा-242, अक्कलकुवा-469 तर धडगाव तालुक्यातील 553 अंगणवाडय़ांच्या 1 लाख 32 हजार 852 बालकांनाही या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह़े अंगणवाडी क्षेत्रात एक ते तीन वयोगटात 51 हजार 281, तीन ते पाच वयोगटात 52 हजार 606 तर पाच ते सहा वर्ष वयोगटात 28 हजार 965 बालकांचा समावेश आह़े अंगणवाडी सेविकांकडून या बालकांना गोळ्या वाटपाची तयारी पूर्ण करण्यात आली आह़े