शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

सामूहिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजर समाज मंचतर्फे गुरुवारी मनरद, ता.शहादा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामूहिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : गुजर समाज मंचतर्फे गुरुवारी मनरद, ता.शहादा येथे समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा तिसरा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात १३ जोडप्यांचे शुभमंगल समाजाच्या प्रथेनुसार लावण्यात आले. या सोहळ्याला सुमारे १० हजार समाज बांधव उपस्थित होते. हा सोहळ्यातील विवाह ठरलेल्या मुहूर्तावर लावण्यात आला.मनरद गावाजवळील पटांगणामध्ये प्रशस्त मंडप टाकण्यात आला होता. दर्शनी भागात लावलेले लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे बॅनर लक्ष वेधून घेत होते. तसेच विवाह सोहळ्याचा परिसर फुले व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.  या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कमलताई पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, जयश्री दीपक पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माधव जंगू पाटील, ईश्वर भूता चौधरी, व्हीएसजीजीएमचे प्रमुख मोहन पटेल, जि.प.चे माजी सभापती डॉ.भगवान पाटील, के.डी. पाटील, गुजर समाज मंचचे अध्यक्ष श्रीपत पाटील, उपाध्यक्ष हरी दत्तू पाटील, मध्य प्रदेश गुजर  समाजाचे अध्यक्ष विश्वासराव देसले,  देवनारायण सेना,  शैलेंद्रसिंग गुजर, निझरचे मणिलाल पटेल, प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, सुरत जिल्हा बँकेचे संचालक सुनील पाटील, सुमूल डेअरीचे भरत पटेल आदी उपस्थित उपस्थित होते. सजवलेल्या पाच ट्रॅक्टर ट्रॉलीवर वरांची वाजत-गाजत वरात काढण्यात आली. वधूंनादेखील सजविलेल्या लक्झरीमध्ये लग्नमंडपात आणण्यात आले. प्रत्येक वर-वधूसाठी स्वतंत्र असे १३ स्टेज उभारण्यात आले होते. स्वतंत्र स्टेजवर वर व वधू यांना बसवून त्यांच्यासमोरच त्यांच्याकडील वºहाडी मंडळीसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. भागवतकार अविनाश जोशी व ह.भ.प. वसंत महाराज यांनी  मंगलअष्टके म्हटली. लग्न वेळेवर म्हणजे दहा वाजून पाच मिनिटांनी लावण्यात आले. विवाहानंतर सर्व वर-वधूंना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र जागेवरच मनरदचे उपसरपंच संजय पाटील व ग्रामसेवक उमेश जाधव यांनी दिले. सामूहिक विवाह सोहळ्यास आलेल्या वºहाडींना भोजनासाठी महिला व पुरुष यांच्यासाठी दोन वेगळे मंडप टाकण्यात आले होते. भोजनासाठी प्लॅस्टीकच्या साहित्याचा वापर टाळण्यात आला. प्रास्ताविक हरी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शरद पाटील व सेजल रविकांत पटेल तर आभार आय.डी. पटेल व डी.सी. पाटील यांनी मानले.सामूहिक विवाह सोहळ्यासाठी सुरत येथील विश्व कल्याण ग्रुपतर्फे ५० वृक्षांची रोपे भेट देण्यात आले. नववधू-वरांच्या हस्ते या रोपांचे मनरद येथील लाभदायक विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यातून निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच विश्व कल्याण ग्रुपतर्र्फेेच प्रत्येक वर-वधूंना भगवतगीता भेट देण्यात आली.४विवाह सोहळ्यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास दवाखाना, डॉक्टरांची टीम, अ‍ॅम्बुलन्स, तज्ज्ञ डॉक्टर, मोबाईल स्वच्छालय,  अग्निशमन दल आदींची व्यवस्था करण्यात आली होती.बुधवारपासून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी मनरद, करजई व लांबोळा येथील भगिनींनी हजेरी लावली. त्यांनी स्वत: आंब्याच्या पानांपासून तोरण झेंडूची फुले गुंफून त्यापासून माळ तयार केली होती. ट्रॅक्टरला सजवण्यासाठी फुलांच्यामाळा त्यांनी तयार केल्या होत्या. तसेच वधू सासरी जाताना जे लाडू देतात तेदेखील त्यांनी स्वत:च बांधून तयार केले होते. लग्नसोहळा आटोपल्यावर परिसरामध्ये स्वच्छता राहावी यासाठी स्वत: परिसर स्वच्छ  केला हे विशेष कौतुक करण्यासारखे आहे.